आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Varun Dhawan Was Unconscious During The Shooting Of 'Street Dancer 3D', He Completed The Shooting In Two Shifts After He Was Cured

'स्ट्रीट डान्सर 3 डी' च्या सेटवर शूटिंगदरम्यान बेशुद्ध झाला होता वरुण धवन, बरा झाल्यावर दोन शिफ्टमध्ये पूर्ण केले शूटिंग 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : वरून धवनचा चित्रपट 'स्ट्रीट डान्सर 3डी' चे शूटिंग आता पूर्ण झाले आहे. मात्र हे शूटिंग पूर्ण करण्यासाठी वरुणाला खूपच मेहनत घ्यावी लागली. झाले असे की, 'स्ट्रीट डान्सर 3डी' ची टीम मुंबईमध्ये फायनल डान्स फेस ऑफचे रिहर्सल करत होती. यादरम्यान वरुण धवन बेशुद्ध झाला. मिड डेच्या रिपोर्टनुसार, 'वरून आधीच आजारी होता, त्याला काही दिवसांपासून सर्दी, आणि खोकला होता. तरीही तो शूटिंग वेळेवर संपवण्यासाठी आराम न करता रिहर्सल करत होता. त्याची हीच चूक त्याला महागात पडली. तो बेशुद्ध झाल्यानंतर लगेचच डॉक्टरला बोलावले गेले आणि कळाले की, त्याचे ब्लड प्रेशर खूप लो झाले आहे आणि त्याला काही दिवस बेड रेस्टचा सल्ला दिला गेला आहे. 

 

मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ठीक झाल्यानंतर वरुण धवनने डबल शिफ्टमध्ये काम केले जेणेकरून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण व्हावे. 26 जुलैला याची रॅपअप डेट होती आणि वरुणने ते वेळेत पूर्ण केले. मिळालेल्या माहितीनुसार, वरुणने याचे शूटिंग रात्रीच्या 1 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत केले जेणेकरून तब्येत खराब झाल्यामुळे काही दिवस जे शूटिंग थांबले होते त्याची भरपाई होऊ शकेल. हा चित्रपट पुढच्यावर्षी 26 जानेवारीच्या आसपास रिलीज होणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...