Bollywood / वरून धवनचे वडील आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन आपल्या आजाराबद्दल म्हणाले, 'अभी तो मैं जवान हूं...'

साधारणत: सेलिब्रिटी आपल्या आजाराचे वृत्त सार्वजनिकरीत्या जाहीर करत नाहीत

Sep 09,2019 05:08:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : डेव्हिड धवन यांनी नुकतेच बँकॉक येथे आपला आगामी चित्रपट 'कुली नंबर १'चे पहिले शूटिंग शेड्यूल पूर्ण केले. सध्या मुंबईत चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलची शूटिंग सुरू आहे. डेव्हिड यांना अल्झायमर झाल्याचे वृत्त सेटवरून मिळाले आहे. अशा वेळी सेटवरील दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांचा मोठा मुलगा रोहित धवनने आपल्या खांद्यावर घेतली आहे. या वृत्ताची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही डेव्हिड धवन यांच्याशी चर्चा केली. जाणून घेऊया ते काय म्हणाले...

डेव्हिड धवन म्हणाले, 'तुम्ही विचारपूस केल्याबद्दल प्रथम मी तुमचे आभार मानतो. सध्या मी फिट आहे आणि आधीपेक्षा आता बरे वाटत आहे. बुधवारपासून मुंबईत चित्रपटाची शूटिंग सुरू झाल्याने त्यामध्ये व्यग्र आहे. बँकॉकमध्येही मी बहुतांश भागाची शूटिंग केली आहे. मी आजारी असल्यामुळे नाही तर सेटवरील कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी मोठा मुलगा रोहित तिथे काम सांभाळत होता. तो स्वत: एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. असो, अभी तो मैं जवान हूं.'

खरे म्हणजे डेव्हिड यांना अल्झायमर झाल्याचे वृत्त बँकॉकच्या सेटवरूनच बाहेर आले. सेटवर उपस्थित एका सूत्राचे म्हणणे होते की, तिथे शूटिंग सुरू असताना रोहित धवन बराच काळ हजर असायचा. त्याची हजेरी आणि सातत्याने कॅमेरा व मॉनिटरमागे राहत असल्याने तेथील लोकांमध्ये चर्चेला ऊत आला होता. एक प्रकारे रोहितच दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत होता. तो कलावंतांना दृश्येही समजावून सांगत होता. अंतिमत: डेव्हिड यांची तब्येत ठिक नसल्याचे समोर आले. कदाचित त्यांना अल्झायमर झाला आहे. यामध्ये व्यक्तीची स्मरणशक्ती कमकुवत होते. यामुळेच रोहित सेटवर त्यांना मदत करत होता.

यांनीही आजाराबाबत सांगितलेले नाही
जाणकारांच्या मते, साधारणत: सेलिब्रिटी आपल्या आजाराचे वृत्त सार्वजनिकरीत्या जाहीर करत नाहीत.
- गेल्या वर्षी ऋषी कपूर यांची प्रकृती खालावली होती तेव्हा अनेक आठवड्यांपर्यंत कँसर असल्याचे त्यांनी कुणालाच सांगितले नव्हते.
- मिथुन चक्रवर्तीदेखील आपला पाठदुखीचा त्रास लपवला होता.

X