आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

 'कुली नंबर 1'मधील वरुण धवनचा न्यू लूक,  साराने फोटो शेअर करुन स्वत:ला 'कूल', तर वरुणला म्हटले "कुली'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान ही जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे.  90 च्या दशकातील गाजलेल्या 'कुली नंबर 1' या चित्रपटाच्या  रिमेकमध्ये हे दोघे झळकणार असून सध्या या चित्रपटाचे ते शूटिंग करत आहेत. मंगळवारी सेटवरून साराने वरुन धवनसोबतचा तिचा एक फोटो शेअर केला. यावर तिने लिहिले..., 'कूल अँड कुली'. 

'कुली नंबर 1' हा चित्रपट डेविड धवन दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट याच नावाने 1995 मध्ये रिलीज झाला होता. यात गोविंदा आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत होते. तर आता वरुण गोविंदाच्या तर सारा करिश्मा कपूरच्या भूमिकेत झळकणार आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवन याचेही दिग्दर्शक आहेत.