आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Varun Dhawan's 'Street Dancer' Earns Rs 10 Crore On First Day, Only 2.77 Crore Collection Of Kangana Runot's 'Panga'

पहिल्या दिवशी वरुण धवनच्या 'स्ट्रीट डान्सर' ने कमावले, 10 कोटी, कंगना रनोटच्या 'पंगा'चे केवळ 2.77 कोटी कलेक्शन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : वरुण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्ट्रीट डान्सर 3डी' ने पहिल्या दिवशी घरगुती बॉक्स ऑफिसवर सुमारे 10.26 कोटी रुपये कमावले. तर कंगना रनोट अभिनीत 'पंगा' चित्रपटाला 2.77 कोटींवरच समाधान मानावे लागले. ट्रेड एनालिस्ट तरन आदर्शच्या ट्वीटनुसार, रेमो डिसूजाच्या दिग्दर्शनात बनलेला 'स्ट्रीट डान्सर' ची सुरुवात आणि आणखी मोठ्या आकड्यांसोबत व्हायला हवी होती. कारण हा यूथ सेंट्रिक चित्रपट आहे आणि या प्रकारच्या चित्रपटांचे ओपनिंग सामान्यतः मोठ्या प्रमाणावरच होते. डायरेक्टर अश्विनी अय्यर तिवारीच्या 'पंगा' चित्रपटाने शुक्रवारी संध्याकाळच्या शोजमध्ये वेग धरला. तरीदेखील चित्रपटाला मोठी ओपनिंग मिळू शकली नाही. 
 

अपेक्षेप्रमाणे नाही झाली सुरुवात... 

फिल्म डिस्ट्रीब्यूटर, एनालिस्ट आणि मल्टीप्लेक्स मालक राज बन्सल म्हणतात, "दोन्ही चित्रपटांना पॆक्षेप्रमाणे सुरुवात मिळाली नाही. 'पंगा'चे कौतूक आहे, पण कलेक्शन नाही. चांगल्या माउथ पब्लिसिटीमुळे आज (शनिवार) कलेक्शन वाढण्याची शकयता आहे. 'स्ट्रीट डान्सर' च्या कलेक्शनमध्ये खूप जास्त वाढ होत असल्याचे दिसत नाही. जर आज कलेक्शनमध्ये वाढ झाली नाही तर दोन्ही चित्रपट सर्व्हाइव्ह होणे कठीण दिसते आहे." 

मुंबई सर्किटमध्ये 'स्ट्रीट डान्सर' ला बसला 'तान्हाजी'चा फटका... 

आदर्शने आपल्या ट्वीटमध्ये हेदेखील सांगितले आहे की, मुंबई सर्किटमध्ये रेमो डिसूजाच्या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट 'स्ट्रीट डान्सर' चे कलेक्शन आधीपासूनच सुरु असलेल्या अजय देवगण स्टारर 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' मुळे प्रभावित झाले आहे. दमदार वीकेंडसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाच्या कमाईमध्ये ग्रोथ होणे गरजेचे आहे.   

बातम्या आणखी आहेत...