आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun Gandhi Files Nomination Papers News In Marathi

देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या सक्षम नेत्याची गरज- वरुण गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुलतानपूर (उत्तर प्रदेश)- विराट रोड शोनंतर भाजपचे महासचिव वरुण गांधी यांनी आज (मंगळवार) सुलतानपूर येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना वरुण म्हणाले, की देशाला नरेंद्र मोदी यांच्या सारख्या सक्षम नेत्याची गरज आहे. मी सकारात्मक राजकारण केले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढल्याने यश मिळणार नाही.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी वरुण गांधी यांच्या समर्थकांनी विराट रोड शो आयोजित केला होता. ढोल ताशांच्या निनादात हा रोड शो जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. त्यानंतर पुष्पवर्षाव करीत कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, वरुण गांधी यांना रोड शोला जरा कात्री लावावी लागली. केवळ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यात आली होती. रोड शो आयोजित करण्यात आल्याची माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले. त्यानंतर रोड शो आटोपता घेण्यात आला.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी पिलभित मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळी ते सुलतानपूर येथून निवडणूक रिंगणार उतरले आहेत. त्यांची लढत सुलतानपूरचे खासदार संजयसिंह यांची पत्नी अमितासिंह (कॉंग्रेस), शकिल अहमद (भाजप) आणि पवन पांडे (बहुजन समाज पक्ष) यांच्यासोबत आहे.