आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या धर्तीवर पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा ही जिल्हा परिषदेची शाळा साकारण्यात येणार असल्याची माहिती जि.प. अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर यांनी बुधवारी दिली.
झीरो एनर्जी इमारत, लॉन, नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती, क्रीडा, साहित्य आणि जागतिक दर्जाचे माहिती तंत्रज्ञान आदींचा वापर करून शाळेतील विद्यार्थ्यांचा चतुरस्त्र विकास घडवण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विविध पावले उचचली जात आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेनेही नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा येथील शाळेची निवड केली आहे. हि शाळा वाबळेवाडी जि.प. शाळेच्या धर्तीवर विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सुमारे तीनशे शाळा याच पद्धतीने विकसित करण्याचा मानस असल्याचे अॅड. डोणगावकर यांनी सांगितले. जुन्या पद्धतीने एक वर्गखोली बांधण्यासाठी जवळपास साडे सात लाख रुपये खर्च येतो, तर बळेवाडीच्या धतीवर काचेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी जवळपास साडेसहा लाख रुपये खर्च येणार आहे. वरवंडी तांडा येथे आठ वर्गखोल्या बांधाव्या लागणार असून, इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे एक कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी ग्रामस्थांकडून दहा लाख रुपयांचा निधी लोकवर्गणीतून उभारण्यात येणार आहे, तसेच तीस लाख रुपये स्थानिक आमदाराच्या निधीतून मिळणार आहे. पैठणमधील पेप्सी, कॅनपॅक या कंपन्यांकडून सुमारे तीस लाख रुपये सीएसआर फंडातून मिळणार आहेत. तर उर्वरीत सुमारे चाळीस लाख रुपये जि.प. सेसमधून देण्यात येणार असल्याचे अॅड. डोणगावकर म्हणाल्या.
वरवंडी तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेत सध्या 205 विद्यार्थी असून, पहिली ते आठवीपर्यंत हि शाळा आहे. या शाळेत एकूण 8 वर्ग आहेत. ही शाळा वाबळेवाडीच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. चारही बाजूंनी काचेच्या भिंती असणारे वर्ग उभारण्यात येणार आहेत. काचेच्या भिंती असल्याने वर्गात प्रकाशाची गरज पडत नाही. बाहेरील तापमानापेक्षा आतील तापमान कमी ठेवण्याच्या विशिष्ट प्रकारच्या या काचामुळे पंख्याचीही गरज भासत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.