आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईसह पालघर, ठाण्यात सीरियल रेपिस्टची दहशत; नागरिकांकडून हातात काठ्या घेऊन जागता पहारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कार करणारा सीरियल रेपिस्ट आता वसई, विरारमध्ये दाखल झाला आहे. नालासोपाऱ्यात चार दिवसात नराधमाने चार मुलींना आपली शिकार बनवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनीच आता हातात काठ्या घेऊन जागता पहारा देण्यास सुरूवात केली आहे. 


नराधम अल्पवयीन मुलींना निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करतो. त्याच्याविरोधात नवी मुंबई, ठाणे, पालघर येथे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील तलिंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसात दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. हा वासनांध नराधम 25 ते 35 वर्ष वयोगटातील असून त्याने 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना आपली शिकार बनवले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...