आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसंत पंचमी : जाणून घ्या, देवी सरस्वती पूजेचे शुभ मुहूर्त आणि पूजन विधी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची विधिव्रत पूजा केल्यास विद्या आणि बुद्धीसोबत निश्चित यश मिळते. माघ मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवशी मुख्यतः विद्येची देवी सरस्वतीचे पूजन केले जाते. या वर्षी वसंत पंचमी 10 फेब्रुवारी रविवारी आहे. शास्त्रानुसार विद्येमुळे विनम्रता, विनम्रतेने पात्रता, पात्रतेने धन आणि धनाने सुख मिळते.  वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा खालील प्रमाणे करावी...


देवी सरस्वती पूजेचे शुभ मुहूर्त 
ज्योतिर्विद अर्चना सरमंडल यांच्यानुसार वसंत पंचमीला रेवती नक्षत्र, शुक्ल पक्ष, कुंभ राशीतील बुध तसेच सूर्य ग्रहासोबत अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत. या दिवशी सरस्वती पूजनाचा मुहूर्त सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 पर्यंत आहे.


पूजन विधी
- सकाळी स्नान करून पवित्र आचरण, वाणी संकल्पाने सरस्वतीची पूजा करा.
- पूजेमध्ये गंध, अक्षतासोबत विशेषतः पांढरे आणि पिवळे फुल, पांढरे चंदन, पांढरे वस्त्र सरस्वतीला अर्पण करावेत.
- नैवेद्यामध्ये पिवळे तांदूळ, खीर, दुध, तिळाचे लाडू, तूप, नारळ असावे.
- त्यानंतर देवी सरस्वतीची आरती करावी


सरस्वती स्तुती
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता,
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता,
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा ।।1।।

शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाद्यां जगद्व्यापिनीं
वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यांधकारपहाम्।
हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्।।2।।


या मूळ मंत्राने करा देवी सरस्वतीचे पूजन, प्राप्त होतील शुभफळ
हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक देवी आणि देवतांचा एक मूळ मंत्र असतो. या मंत्राने त्यांचे आवाहन केले जाते. हे मंत्र विशेष सिद्ध असतात. वेदानुसार अष्टाक्षर मंत्र देवी सरस्वतीचा मूळ मंत्र - श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा हा आहे. देवी सरस्वतीची पूजा करताना तसेच नैवेद्य दाखवताना या मंत्राचा जप अवश्य करवा. सरस्वती पूजन करताना खालील श्लोकांचा उच्चार करून देवी सरस्वतीचे ध्यान करावे....


सरस्वती शुक्लवर्णां सस्मितां सुमनोहराम्।।
कोटिचंद्रप्रभामुष्टपुष्टश्रीयुक्तविग्रहाम्।
वह्निशुद्धां शुकाधानां वीणापुस्तकमधारिणीम्।।
रत्नसारेन्द्रनिर्माणनवभूषणभूषिताम्।
सुपूजितां सुरगणैब्र्रह्मविष्णुशिवादिभि:।।
वन्दे भक्तया वन्दिता च मुनीन्द्रमनुमानवै:।
(देवी भागवत 9/4/45-48)

बातम्या आणखी आहेत...