आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसंत पंचमी म्हणजे सरस्वती देवीच्या पूजेचा पर्व यावर्षी 30 जानेवारीला साजरा केला जाईल. या दिवशी बुद्धीची अधिष्ठात्री देवी सरस्वतीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. पौराणिक मान्यतेनुसार वसंत पंचमीला देवी सरस्वती प्रकट झाली होती. वसंत पंचमीच्या दिवशी विद्यार्थी, कलाकार, संगीतकार आणि लेखक इ. देवी सरस्वतीची उपासना करतात. स्वरसाधक देवी सरस्वतीची उपासना करून देवीकडे स्वर प्रदान करण्यासाठी प्रार्थना करतात. पुराण कथेतील मान्यतेनुसार, ज्यावेळी ब्रह्मदेवाने भगवान विष्णुच्या आज्ञानुसार सृष्टिची रचना केली. त्यानंतर मनुष्याची रचना केली. पण, मनुष्याच्या रचना केल्यानंतर ब्रह्मदेवला काहीतरी कमतरता राहिल्याचे जाणवले, मनुष्याची रचना केल्यानंतर देखील सगळीकडे मौन (शांती) पसरली आहे असे ब्रह्मदेवाच्या लक्षात आले. यानंतर भगवान ब्रह्मदेवाने विष्णुंची अनुमति घेवून एका चर्तुभुजी स्त्रीची रचना केली, जिच्या एका हातात वीणा तर दुसरा हात वर मुद्रेत होता. इतर दोन्ही हातांमध्ये पुस्तक आणि माळा होत्या. यानंतर ब्रह्मदेवाने देवीला वीणा वाजवण्याची विनंती केली. जसे देवीने वीणा वाजवण्यास सुरूवात केली तसे संसारातील सर्व जीव-जतुंना वाणी प्राप्त झाली. सृष्टीला एकप्रकारचे विशेष सौंदर्य प्राप्त झाले. तेव्हापासून ब्रह्मदेवाने त्या देवीला वाणी देवी सरस्वती असे संबोधले. सरस्वतीची भगवती, शारदा, वीणावादिनी आणि वाग्देवी यासारख्या अनेक नावांनी पुजा केली जाते. ही देवी विद्या आणि बुद्धि प्रदान करते. संगीताची उत्पत्ति केल्याने यादेवीला संगीताचीदेवी देखील म्हटले जाते. वसंत पंचमीचा दिवस हा देवीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. ऋग्वेदात देखील देवी सरस्वतीचे वर्णन करण्यात आले आहे. या देवीची समृद्धि आणि स्वरूपाचे वैभव अद्भुत आहे. पुराणकथेनुसार श्रीकृष्णाने सरस्वतीवर खुश होऊन तिला वरदान दिले होते की, वसंत पंचमीच्या दिवशी तुझी आराधना केली जाईल. त्यामुळे यादिवशी देवी सरस्वतीची आराधना आणि पुजा करण्याची प्रथा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.