आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंत पंचमी 30 जानेवारीला : देवी सरस्वतीला प्रिय आहे वीणा, होतो हा खास फायदा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 30 जानेवारीला वसंत पंचमी आहे. वसंत पंचमीला विद्येची देवी सरस्वतीचा प्रकट उत्सव साजरा केला जातो. देवीची विशेष पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी देवी सरस्वतीशी संबंधित शुभ वस्तू पूजेमध्ये ठेवाव्यात. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या वस्तू पूजेत ठेवू शकता...

  • देवी सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो

वसंत पंचमीला देवी सरस्वतीच्या फोटो किंवा मूर्तीची विशेष पूजा करावी. या दिवशी देवीची मूर्ती खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. सरस्वतीला विद्येची देवी मानले जाते. देवीची मूर्ती घरात ठेवून रोज पूजा केल्यास जीवनात यश प्राप्त होऊ शकते. विचार सकारात्मक होतात.

  • वीणा

वीणा देवी सरस्वतीच्या प्रिय वस्तूंपैकी एक आहे. वीणा घरात ठेवल्याने सुख-शांतीचे वातावरण राहते. वीणामधील सकारात्मक ऊर्जेने घरातील विविध वास्तुदोष नष्ट होतात.

  • हंसाचा फोटो किंवा शो-पीस

हंस देवी सरस्वतीचे वाहन असल्यामुळे पूजनीय मानले गेले आहे. देवी पूजेमध्ये हंसाचा फोटोही ठेवू शकता. पूजा झाल्यानंतर हंसाचा फोटो घरात अशा ठिकाणी ठेवावा, ज्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांची दृष्टी पडेल.

  • मोरपंख

मोरपंख विविध देवी-देवतांना अर्पण केला जातो. मोरपंख देवघरात आणि मुलांच्या खोलीत ठेवू शकता.

  • कमळाचे फुल

पूजेमध्ये इतर फुलांसोबतच कमळाचे फुल अवश्य ठेवावे. कमळाचे फुल देवघरात ठेवल्याने घरात शांतता राहते. देवी सरस्वती पांढऱ्या रंगाच्या कमळावर विराजित राहते. यामुळे देवीला पांढरे कमळ विशेष प्रिय आहे.

बातम्या आणखी आहेत...