आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔराळा, लासूर स्टेशन- कन्नड तालुक्यातील चापानेर येथील सहकारमहर्षी लोकनेते स्व. नारायणराव पवार यांचे भाऊ महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणे चे माजी संचालक कृषिभूषण वसंतराव बाजीराव पवार यांचे दीर्घ आजाराने (६२) औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता उपचारादरम्यान निधन झाले.
कृषिभूषण वसंतराव पवार यांनी विविध पदे भूषवली ते १९९७ ला कन्नड सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. २००५- २०१० मध्ये ते औरंगाबाद जिल्हा भू-विकास बँकेचे संचालक होते. २००५-२०१० महाराष्ट्र बाजार समिती संघ पुणे चे बिनविरोध संचालक होते. ते दरवर्षी कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व हंगाम मेळावे घेत होते. त्याचा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता. त्यांचे शेती क्षेत्रात मोठे भरीव योगदान असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना २००१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते कृषिभूषण हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, मुलगा,जावई, नातवंडे, असा परिवार आहे. जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार यांचे ते चुलते होत. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी १० वाजता चापानेर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.