घरामध्ये होणाऱ्या या / घरामध्ये होणाऱ्या या 5 छोट्या-छोट्या चुका, भाग्योदय होऊ देत नाहीत

Aug 06,2018 12:22:00 PM IST

ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो तेथे राहणाऱ्या लोकांचा सहजपणे भयोदय होत नाही. वास्तु दोषामुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. घरामध्ये करण्यात येणाऱ्या छोट्या-छोट्या चुकांमुळे आर्थिक कामामध्ये अडथळे निर्माण होतात. कोलकाताच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, 5 असे काम जे बहुतांश लोक करतात परंतु यापासून दूर राहावे...


# तिजोरीमध्ये पैशांसोबत चुकीच्या वस्तू ठेवू नयेत
तुमच्या घरामध्ये तिजोरी असल्यास कधीही रिकामी ठेवू नये. तिजोरीमध्ये पैसा, मौल्यवान दागिने ठेवावेत परंतु कोर्ट प्रकरण, कर्जाशी संबंधित कागदपत्र ठेवू नयेत. तिजोरी नेहमी स्वच्छ असावी.


# उपयोग नसल्यास बाथरूम उघडे ठेवणे
वास्तुनुसार बाथरूममधून घरात निगेटिव्ह एनर्जी येते. बाथरूमचा वापर नसल्यास याचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. बाथरूम नेहमी स्वच्छ असावे. अस्वच्छ बाथरूम कामामध्ये अडथळ्यांचे कारण बनू शकते.


# बेडरूममध्ये आरसा लावणे
बेडरूममध्ये पलंगाच्या समोर आरसा लावलेला असल्यास हे वास्तुदोषाचे कारण ठरू शकते. यामुळे पती-पत्नीमध्ये तणाव वाढतो. बेडरूममध्ये आरसा लावलेला असल्यास झोपण्यापूर्वी त्यावर पडदा अवश्य टाकावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

# आलमारी उघडी ठेवणे घरामध्ये उघडी ठेवलेली आलमारी नकारात्मकता वाढवते. या दोषामुळे लोकांमध्ये मतभेद वाढतात. कोणत्याही कामामध्ये मन एकाग्र होत नाही.# डस्टबिन नेहमी उघडे ठेवणे डस्टबिन नेहमी बंद राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. हे नेहमी उघडे असल्यास आजार पसरू शकतात. यामुळे वास्तुदोषही वाढतात.
X