जेवणाशी संबंधित हा / जेवणाशी संबंधित हा एक उपाय केल्यास संपूर्ण कुटुंबाची होऊ शकते प्रगती

Aug 09,2018 12:01:00 AM IST

घरामध्ये सुखू-समृद्धी कायम ठेवण्यासाठी ज्योतिष आणि वास्तू शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूमध्ये दिशांच्या आधारे नियम सांगण्यात आले आहेत. प्राचीन काळापासून या नियमांशी संबंधित म्हणी प्रचलित आहेत. येथे जाणून घ्या, कोणत्या घरांमध्ये सुख-समृद्धी कायम राहते...


गज जेहि हारै झूंड उठावैं। सकल शगुन अस बात जतावै।।
जो पहिले घर-देव खिचावै। उहि घर को बहि दैव रखावै।।
अर्थ -
ज्या घरामध्ये जेवण करण्यापूर्वी वास्तू देवतेला नैवेद्य दाखवला जातो, तेथे सुख-समृद्धी कायम राहते. वास्तू देवतेला नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण करावे. अशा घरामध्ये राहणारे सदस्य लवकर प्रगती करतात.


जाकै पूरब पीपल होवे। सो लक्ष्मी पर लक्ष्मी खोवे।।
अर्थ -
ज्या घराच्या पूर्व दिशेला पिंपळाचे झाड असते, त्या घरात राहणाऱ्या लोकांना वारंवार धनहानी होत राहते. अशा घरांमध्ये पैसा टिकत नाही.


जेहिं मुंडे पर अशोक वृक्ष बासा। शोक रहत उई भवत सुवासा।।
अर्थ -
अशोकाचे झाड असलेल्या ठिकाणी घर बांधणे उत्तम राहते. अशा घरात राहणाऱ्या लोकांना सुख लागते. यामुळे घराजवळ अशोकाचे झाड अवश्य लावावे. यामुळे वास्तुदोषही दूर होतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

सिंह मुखी जो रहने जावै। तन, धन आपन सकल गंवावै। अर्थ - ज्या घराचे मुख समोरून रुंद आणि मागील बाजूने निमुळते असते अशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. घरातील एखादा सदस्य नेहमी आजारी राहतो. औषधींवर जास्त पैसा खर्च होतो.छोटे दरवाजो मोटी चोर। बहों होय तो आफत घोर।। अर्थ - ज्या घराचे मेनगेट खूप छोटे असते तेथे चोरी होण्याची शक्यता जास्त राहते. ज्या घराचा मुख्य दरवाजा खूप मोठा असतो, तेथे जास्त समस्या राहतात. यामुळे घराचे मेनगेट जास्त छोटे आणि मुख दार खूप मोठे असू नये.
X