Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Vastu Shastra for Money Plant

मनीप्लांट लावल्याने होतो धनलाभ आणि घरात येते सुख-समृद्धी, सुकलेल्या प्लांटचा पडतो अशुभ प्रभाव

रिलिजन डेस्क | Update - Sep 11, 2018, 12:49 PM IST

वास्तु शास्त्रामध्ये प्रत्येक झाडासाठी एक विशिष्ट दिशा सांगितलेली आहे. जर योग्य दिशेत झाड लावले तर त्याचे अनेक फायदे मिळ

 • Vastu Shastra for Money Plant

  वास्तु शास्त्रामध्ये प्रत्येक झाडासाठी एक विशिष्ट दिशा सांगितलेली आहे. जर योग्य दिशेत झाड लावले तर त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. परंतु चुकीच्या दिशने लावलेले रोपटे फायद्यांऐवजी दुष्परिणाम पोहोचवू शकतात. घरात मनीप्लांट लावल्याने धन आणि सुख-समृध्दि वाढू शकते. परंतु चुकीच्या दिशेने ठेवलेल्या मनीप्लांटमुळे तुम्हाला पैशाचे नुकसान होऊ शकते. ज्जैन के ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार सामान्यतः मनीप्लांट घराच्या सुख-समृद्धीसाठी लावला जातो परंतु अनेकवेळा याच्या अशुभ प्रभावाने नुकसानही होऊ शकते. यामुळे मनीप्लांट लावताना येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...


  या दिशेला ठेवू नये मनीप्लांट
  मनीप्लांटसाठी सर्वात नकारात्मक दिशा ईशान्य (उत्तर-पूर्व) कोपरा मानला जातो. या दिशेला मनीप्लांट लावल्यास धनवृद्धी होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.


  येथे मिळेल फायदा
  उत्तर किंवा पूर्व-उत्तर दिशा जल तत्त्व आहे. दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम दिशा पृथ्वी तत्त्व आहे. या दिशेला मनीप्लांट ठेवल्यास चांगले प्रभाव दिसून येतात आणि घरामध्ये धन-धान्य कमी पडत नाही.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

 • Vastu Shastra for Money Plant

  जमिनीवर पसरू देऊ नये...
  मनीप्लांटचा वेल कधीही जमिनीवर पसरू देऊ नये. मनीप्लांट पसरलेल्या स्थितीमध्ये असल्यास घरात विविध प्रकारचे नुकसान होऊ शकते.

 • Vastu Shastra for Money Plant

  या गोष्टीकडे द्यावे विशेष लक्ष 
  मनीप्लांट वाळून जाणे किंवा पाने पांढरी होणे अशुभ मानले जाते. यामुळे दररोज मनीप्लांटला पाणी द्यावे आणि सुकून गेलेली पाने काढून टाकावीत.

Trending