आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचनसमोर असू नये बाथरूम, असल्यास यामध्ये लावावा पडदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकवेळा घर बांधताना अशा काही चुका होतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. या वास्तुदोषाचा प्रभाव घरात राहणाऱ्या सर्व सदस्यांवरही पडतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार काही साधेसोपे बदल करून हे वास्तुदोष दूर केले जाऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या वास्तू टिप्स सांगत आहोत...


1. शुभ चिन्ह उदा.लक्ष्मी, गणेश, स्वस्तिक, ऊं किंवा इतर मांगलिक चिन्ह मेनगेटवर लावावे. 


2. किचनसमोर बाथरूम असू नये. असल्यास किचन आणि बाथरूममध्ये पडदा अवश्य लावावा.


3. घराच्या छतावर व्यर्थ सामान पडलेले असेल तर ते लगेच घरातून काढून टाकावे. यामुळे वास्तुदोष वाढतात.


4. घराच्या भिंतीचे प्लास्टर निघाले असेल तर लगेच दुरुस्त करून घ्यावे. वेळोवेळी घराची रंगरंगोटी करावी.


5. घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडताना-बंद करताना आवाज होत असेल तर दुरुस्त करून घ्यावेत. यांच्या आवाजाने घरातील ओरामंडळ प्रभावित होते.


6. आग्नेय (पूर्व-दक्षिण) दिशेला दोष असल्यास येथे झिरो व्हॅटचा बल्ब लावावा.

बातम्या आणखी आहेत...