Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | Vastu Shastra tips for happy life

घराच्या खिडकी-दरवाजांमुळेही होतो वास्तुदोष, या टिप्सने प्राप्त होऊ शकतात शुभ फळ

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 02:34 PM IST

घरातील खिडकी दरवाजांमुळेसुद्धा अनेकवेळा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसा

 • Vastu Shastra tips for happy life

  घरातील खिडकी दरवाजांमुळेसुद्धा अनेकवेळा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार खिडकी-दरवाजांचे घरामध्ये खूप खास स्थान राहते. यामुळे बाहेरची निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करते आणि बाहेर जाते. यामुळे घराचे दरवाजे आणि खिडक्या लावताना काही खास गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, खास टिप्स...


  1. घराचे दरवाजे आणि खिडक्या आतील बाजूस उघडणाऱ्या असणे चांगले मानले जाते. खिडकी-दरवाजा बाहेरील बाजूस उघडणारा असल्यास हा वास्तुदोष मानला जातो.


  2. घरामध्ये खिडकी आणि दरवाजाची संख्या सम असणे शुभ मानले जाते. म्हणजेच 2, 4, 6, 8 किंवा 10 संख्या असावी.


  3. घरामध्ये खिडकी-दरवाजाची संख्या सम नसल्यास काही खिडकी-दरवाजांचा उपयोग बंद करावा किंवा पडदे लावू शकता.


  4. घर किंवा दुकानाचे मेनगेट पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे शुभ मानले जाते परंतु असे नसल्यास घराच्या मेनगेटवर स्वस्तिक किंवा श्रीगणेशचे चिन्ह काढावे.


  5. दररोज घराच्या मेनगेटच्या दोन्ही बाजूला कुंकू आणि हळदीने स्वस्तिक काढावे. यामुळे शुभफळ प्राप्त होतात.


  6. शक्य असल्यास दररोज किंवा आठवड्यातून एकदा घराच्या दरवाजावर आंब्याचे तोरण बांधावे.

Trending