आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या मेनडोअरजवळ करू नये कचरा, येथे असू नये अंधार, दरवाजावर लावावी श्रीगणेशाची मूर्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तू शास्त्रानुसार, प्रत्येक घराचे एक आभा (ओरा) मंडळ असते. घराच्या आतील आणि बाहेरील अनेक गोष्टी याला प्रभावित करतात. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडतो. आज आम्ही तुम्हाला वास्तूच्या अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्या तुमच्या आभामंडळाला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवू शकतात. येथे जाणून घ्या, वास्तूच्या काही खास टिप्स...


1. घराचे मेनगेट नेहमी स्वच्छ ठेवावे. मुख्य दारासमोर रात्री पुरेसा प्रकाश राहील याची व्यवस्था करावी. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते.


2. घराच्या मुख्य दरवाजावर श्रीगणेशाची मूर्ती किंवा फोटो लावू शकतात. दरवाजावर ऊँ लिहावे. दारावर शुभ चिन्ह काढल्याने देव-देवतांची घरावर कृपा राहते.


3. घराच्या नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला अंधार ठेवू नये. वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशेला लख्ख प्रकाशाचा बल्ब लावू नये.


4. घराच्या जवळपास एखादे वाळून गेलेले झाड किंवा खोड असेल तर ते लगेच काढून टाकावे. यामुळेही घराचे आभामंडळ प्रभावित होते.


5. घराचे प्लास्टर निघाले असेल तर व्यवस्थित करून घ्यावे. या गोष्टीकडे क्षुल्लक गोष्ट समजून दुर्लक्ष करू नये.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तीन टिप्स...

बातम्या आणखी आहेत...