आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील निगेटिव्हिटी नष्ट करण्यासाठी करू शकता हे एक सोपे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीला घरातील नकारात्मतेमुळे अडचणींना सामोरे जावे अलगत असेल तर ज्योतिष आणि वास्तूमध्ये सांगण्यात आलेले उपाय केल्याने लाभ होऊ शकतो. वास्तू शास्त्र नकारात्मकता दूर करून घरामध्ये सकारात्मक वातावरण बनवण्यास मदत करते. उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्यामी घरातील निगेटिव्हिटी दूर करण्याचे खास उपाय...

  • पहिला उपाय

रोज सकाळी एका वाटीमध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये तुळशीचे पाने टाकावीत. त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरात तुळशीच्या पानांनी शिंपडावे. या दरम्यान भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा. तुळशीच्या पाण्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन वातावरण पवित्र होते. विष्णु मंत्र : ऊँ नमो भगवते वासुदेवाय।

  • दुसरा उपाय

घरातील एखाद्या व्यक्तीला रात्री वाईट स्वप्न पडत असल्यास झोपण्यापूर्वी कापूर तुपात मिसळून जाळावा. यामुळे घरातील सदस्यांना चांगली झोप लागेल आणि वाईट स्वप्न पडणार नाही.

  • तिसरा उपाय

रात्री झोपण्यापूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात काळे मीठ काचेच्या वाटीत ठेवावे. सकाळी हे मीठ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. असे केल्याने घरात सुख राहते आणि अडचणी दूर होतात.

  • चौथा उपाय

संध्याकाळी पूजा करताना शंख अवश्य वाजवावा आणि घरात शंखाने पाणी शिंपडावे. रोज घरात शंखाने पाणी शिंपडल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि दैवी शक्तींचा वास राहतो.

बातम्या आणखी आहेत...