Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | Vastu tips for Avoid Cancer

वास्तु टिप्स: घरात होत असणा-या 8 चुका असू शकतात कँसरसारख्या भयंकर आजाराचे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 17, 2018, 02:31 PM IST

विज्ञानासोबतच वास्तु शास्त्रसुध्दा कँसरसंबंधीत आजाराविषयी खास गोष्ट सांगते.

 • Vastu tips for Avoid Cancer

  तुम्ही वास्तु शास्त्राचे नियम समजून घेतले, तर तुम्हाला समजेल की, आपल्या जीवनातील अनेक अडचणी यावरुनच दूर केल्या जाऊ शकतात. कारण संकट कसेही असो, वास्तु शास्त्र आपल्याला त्याचे संकेत देते. आपले, ऑफिस किंवा आजुबाजूच्या कोणत्या वस्तू किंवा कोणती ऊर्जा आपल्याला त्रास देत आहे, यासर्वांची माहिती आपल्याला वास्तु शास्त्र देते. येवढेच नाही तर आपल्या नात्यात येणा-या अडचणी या वास्तु शास्त्रामुळेच असतात.

  विज्ञानासोबतच वास्तु शास्त्रसुध्दा कँसरसंबंधीत आजाराविषयी खास गोष्ट सांगते. वास्तु शास्त्रामध्ये दिशांसंबंधीत एकुण 8 दोष सांगितले आहेत. जे व्यक्तीला कँसर सारखे हानिकारक रोग देण्यासाठी जबाबदार आहेत.

  1. पहिला दोष
  जर घराची उत्तर-पूर्व दिशा गोलाकार असेल किंवा एखाद्या कारणामुळे घराची उत्तर-पूर्व दिशा पुर्णपणे बंद केली असेल, तर हा भयंकर वास्तु दोष असतो. यामुळे छातीत कँसर होऊ शकते, ज्यामुळे व्यक्तीच्या फुफ्फूसांवर प्रभाव पडतो.

  2. दूसरा दोष
  घराची कोणती दिशा उंचीवर आहे आणि कोणती खाली, यामुळे वास्तु दोष उत्पन्न होतात. जर घराची उत्तर-पूर्व दिशा खाली आहे. पश्चिम दिशासुध्दा खाली आहे, तर घरात राहणा-या एखाद्या व्यक्तीला नस आणि मानेमध्ये कँसर होण्याची शक्यता असते.

  3. तिसरा दोष
  घराच्या उत्तर-पूर्व, पूर्व किंवा उत्तर पश्चिम भाग उंच असणे किंवा दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम दिशा खाली असणे ब्रेन कँसरचे कारण ठरु शकते. हा कँसर लवकर बरा होत नाही.

  4. चौथा दोष
  वास्तुनुसार घराची उत्तर दिशा नेहमी योग्य आणि स्वच्छ असावी. परंतु असे नसेल तर अनेक दोष उत्पन्न होतात. जर घराच्या उत्तर-पूर्व दिशेसोबत दक्षिण-पूर्व दिशेत वास्तु दोष आला, तर यामुळे छातीत कँसर होऊ शकतो.

  5. पाचवा दोष
  उत्तर-पूर्व, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण दिशा जर वास्तुनुसार दोषपुर्ण असेल तर यामुळेसुध्दा अनेक अडचणी उत्पन्न होऊ शकतात. या दोषांमुळे यूट्रसच्या कँसरची शक्यता असते.

  6. सहावा दोष
  उत्तर-पूर्व दिशा जर दोषपुर्ण असेल तर हे कँसरसारख्या भयंकर आजाराचे कारण असते. यासोतब जर दक्षिण-पश्चिम दिशा किंवा त्याचा एखादा भाग किंवा पुर्ण दक्षिण दिशा दोषपुर्ण असेल, तर हे किडनी कँसरचे कारण असू शकते.

  7. सातवा दोष
  उत्तर-पूर्व दिशेसोबतच घराच्या एखादा भाग दोषपुर्ण असणे घरातील लोकांसाठी चांगले मानले जात नाही. यामुळे ब्लड कँसरची शक्यता असते.

  8. आठवा दोष
  अनेक वेळा घराच्या मधोमध गड्डा असतो. परंतु याची माहिती घरच्यांना नसते. हे घराचे मुख्य स्थान असते. जर येथे खराब पाणी जमा होत असेल, तर हे पोटाच्या कँसरचे कारण असू शकते.

Trending