शांत झोप हवी / शांत झोप हवी असल्यास करू नका या 5 चुका, वाईट स्वप्नही पडणार नाहीत

Aug 08,2018 12:14:00 PM IST

अनेक लोकांना स्लीपिंग डिसऑर्डरची समस्या असते. झोप न येणे, मध्यरात्री झोपमोड होणे, स्वप्न पाहून जाग येणे या सर्व गोष्टी सामान्य समस्या आहेत. काहीवेळा आजारपणामुळे तर काहीवेळा आपल्या चुका आणि वास्तुदोषामुळे झोप न लागण्याची समस्या निर्माण होऊ शकते. वास्तु आणि ज्योतिष शास्त्रामध्ये झोपेशी संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.


आपण बेडरूम आणि झोपण्याशी संबंधित काही गोष्टींमध्ये सुधार केल्यास या समस्येतून मुक्ती मिळू शकते. वास्तुनुसार ज्या कोणत्या वस्तूंमुळे आपल्या बेडरूममध्ये निगेटिव्ह एनर्जी येते, त्या सर्व वस्तू आपली झोप खराब करतात. निगेटिव्हिटीमुळे वाईट स्वप्न आणि अपूर्ण झोपेचा त्रास होतो.


झोपताना लक्षात ठेवा या गोष्टी
1. अटॅच बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवू नये -
तुमच्या बेडरूमला अटॅच बाथरूम असल्यास त्याचा दरवाजा बंद ठेवावा. अनेकवेळा लोक बाथरूम युज केल्यानंतरही दरवाजा बंद करत नाहीत. बाथरूममधून निगेटिव्ह येणारही बेडरूममध्ये येते.


2. केस बांधून झोपावे - रात्री झोपताना केस मोकळे सोडून झोपण्याची सवय वाईट स्वप्न आणि अपूर्ण झोपेला कारणीभूत ठरू शकते. यामुळे रात्री नेहमी केस बांधून झोपावे.


3. चप्पल-बूट ठेवू नये - तुम्ही झोपत असलेल्या रूममध्ये चप्पल-बूट असून नयेत. पलन्गाच्या खाली आणि जवळपास असलेल्या चप्पट-बुटामुळेही झोप व्यवस्थित लागत नाही.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

4. चादर अशी असू नये - झोपण्यासाठी कधीही डार्क चादर, हिंस्र प्राण्याचे फोटो असलेली चादर वापरू नये. चादर फाटलेली नसावी. 5. अंथरून स्वच्छ असावे - झोपण्यापूर्वी अंथरून-पांघरून स्वच्छ करून घ्यावे. अस्वच्छ आणि अव्यवस्थित अंथरुणावर झोपल्याने रात्री भीतीदायक स्वप्न पडू शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, रात्री झोपताना कोणत्या मंत्राचा उच्चार करावा...झोप येत नसल्यास या मंत्राचा उच्चार करावा... अंथरुणावर पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप येत नसल्यास मनातल्या मनात खालील मंत्राचा जप करावा. या देवि सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता। नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ते नमो नमः।। या मंत्राच्या प्रभावाने तुम्हाला शांत झोप लागू शकते.
X