प्राचीन मान्यता / कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी घरामध्ये अवश्य कराव्यात या गोष्टी

संध्याकाळच्या वेळी घरामध्ये दिवा अवश्य लावावा.

रिलिजन डेस्क

Mar 14,2020 12:10:00 AM IST

प्राचीन मान्यतेनुसार घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी काही खास कामे सांगण्यात आली आहेत. जे लोक हे काम करत राहतात त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. वास्तुनुसार घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असणे शुभ राहते. तुमच्या घराचे दार असे नसेल तर दारावर सोने, चांदी, तांबे किंवा पंचधातूपासून तयार केलेले स्वस्तिक लावावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांनी धनलाभ करून देणाऱ्या सांगितलेल्या काही खास टिप्स...


> तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ राहते. तिजोरीच्या दरवाजावर कमळाच्या आसनावर विराजित महालक्ष्मीचा फोटो लावावा.


> घराच्या मुख्य दारासमोर तुळस ठेवावी. रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी दिवा लावावा.


> घरात तुळस लावल्याने कुटुंबात आत्मविश्वास आणि सुख-समृद्धी वाढते. तुळशीच्या जवळपासची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. स्वच्छतेच्या ठिकाणी लक्ष्मीचा वास राहतो.


> एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा पुरोहिताला दान करावयाचे असल्यास घराबाहेर येऊनच दान करावे.


> घरामध्ये व्यर्थ सामान, तुटके फर्निचर, भंगार सामान ठेवू नये. अन्यथा घरातील शांती भंग होऊ शकते.


> रोज संध्याकाळी घरामध्ये प्रकाश करावा. घरातील प्रत्येक खोलीची स्वच्छता करावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.


> घरामध्ये सुख-शांती दर्शवणारे सुंदर फोटो लावावेत. लढाईचे, नकारात्मक संदेश देणारे फोटो लावण्यापासून दूर राहावे.


> घराच्या भिंतींना भेगा पडल्या असतील तर त्या लगेच भरून घ्याव्यात. भेगा वास्तुदोष वाढवतात.


> संध्याकाळच्या वेळी घरामध्ये दिवा अवश्य लावावा.

X