आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावास्तू शास्त्रानुसार, किचन घरातील महिलांवर सर्वात जास्त प्रभाव टाकते. कारण महिलाच या ठिकाणी सर्वात जास्त वेळ काम करतात. किचन कोणत्या दिशेला आहे, याचाही प्रभाव राहतो. किचन चुकीच्या दिशेला असल्यास याचा नकारात्मक प्रभाव घरातील लोकांवर पडू शकतो. येथे जाणून घ्या, किचन बांधताना आणि स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...
1. वास्तू शास्त्रानुसार स्वयंपाक करताना तुम्ही ज्या दिशेला उभे आहेत त्या दिशेची शक्ती शिजवलेले अन्न अवश्य ग्रहण करते. स्वयंपाक करण्याची आदर्श स्थिती म्हणजे तुमचे मुख पूर्व दिशेला असावे. या दिशेला मुख करून स्वयंपाक केल्यास अन्नातून जास्त एनर्जी मिळू शकते.
2. किचन आग्नेय (पूर्व-दक्षिण) दिशेला बांधणे उत्तम राहते. हे करणे शक्य नसल्यास वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशेला किचन बनवू शकता.
3. किचनमध्ये एक खिडकी पूर्व दिशेला अवश्य बनवावी. यामुळे सूर्यप्रकाश घरात येईल. यामुळे वातावरणातील विषारी किटाणू नष्ट होतील.
4. किचनमध्ये पिण्याचे पाणी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. फ्रिज उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवले जाऊ शकते.
5. किचनच्या भिंतीला निळा किंवा आकाशी रंग देऊ नये. किचनमध्ये काळ्या रंगाच्या ग्रॅनाईटचा उपयोग करू नये. त्याऐवजी हिरवा किंवा पांढऱ्या रंगाच्या दगडाचा वापर करू शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.