आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवाव्यात मातीच्या या 5 वस्तू, वाईट काळ होऊ शकतो दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये ठेवण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी वास्तुशास्त्रामध्ये शुभ-अशुभ दिशा सांगण्यात आल्या आहेत. उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्यास घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि वास्तुदोष दूर होतात. मातीपासून बनवलेल्या वस्तूंसाठीसुद्धा नियम आहेत. मातीच्या काही खास वस्तू घरात ठेवल्यास दुर्भाग्य दूर होऊ शकते. येथे जाणून घ्या, मातीच्या कोणत्या वस्तू घरात कुठे ठेवाव्यात...


पहिली वस्तू
घराच्या उत्तर-पूर्व दिशेला मातीपासून बनवलेला पक्षी ठेवावा. याच्या शुभ प्रभावाने घरातील वातावरण सकारात्मक राहते.


दुसरी वस्तू
बहुतांश लोक देवघरात पितळ, सोने किंवा चांदीची मूर्ती ठेवतात. या धातूंच्या मूर्तीसोबतच देवघरात मातीपासून बनवलेली मूर्तीही अवश्य ठेवावी. मातीच्या मूर्तीचा विशेष महिमा सांगण्यात आला आहे.


तिसरी वस्तू
घराच्या दरवाजावर दोन्ही बाजूला मातीचे दोन दिवे अवश्य लावावेत. हा उपाय रोज संध्याकाळी करावा.


चौथी वस्तू 
रोज संध्याकाळी तुळशीजवळ मातीचा दिवा लावावा. या उपायाने घरामध्ये पैसा कमी पडणार नाही.


पाचवी वस्तू 
किचनमध्ये मातीचे भांडे अवश्य ठेवावे. हे भांडे नेहमी गॅसपासून दूर ठेवावे.

बातम्या आणखी आहेत...