आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वास्तू टिप्स : देवघर किंवा त्याच्या जवळपास ठेवू नये तिजोरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळापासून धन, दागिने, मौल्यवान गोष्टी ठेवण्यासाठी घरामध्ये तिजोरी बनवली जाते. बदलत्या काळासोबत या प्रथेमध्ये परिवर्तन आले कारण आता पैसे, दागिने बँकमध्ये ठेवले जातात. परंतु तुम्ही घरात तिजोरी किंवा लॉकर बनवत असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उदा. तिजोरी कुठे असावी, यामध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत. या वास्तू टिप्स उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितल्या आहेत.


1. वास्तुनुसार, धनाचे देवता कुबेर यांचा वास उत्तर दिशेला मानण्यात आला आहे. यामुळे तिजोरी उत्तर दिशेला ठेवणे शुभ राहते.


2. उत्तर दिशेला तिजोरी ठेवणे शक्य नसल्यास ईशान्य किंवा पूर्व दिशेला तिजोरी ठेवू शकतात.


3. गल्ल्यात किंवा तिजोरीत श्रीयंत्र अवश्य ठेवावे. यामुळे तुमच्या व्यवसायात वाढ होत राहील. यासोबतच धनलाभाचे योग जुळून येतील.


4. तिजोरी शक्य तो अशा ठिकाणी ठेवावी, जेथे सहजपणे कोणीही पाहू शकणार नाही. तिजोरीशी संबंधित माहिती घरातील खास लोकांनाच असावी.


5. कोर्ट प्रकरणाचे कागदपत्र कधीही नगदी रोकड आणि दागिन्यांसोबत ठेवू नयेत. यामुळे हानी होऊ शकते.


6. तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. तिजोरीत थोडे तरी पैसे ठेवावेत, यामुळे तिजोरीची सार्थकता कायम राहील.


7. देवघरात मूर्तीच्या खाली कधीही तिजोरी-गल्ला, पैसे ठेवू नयेत. यामुळे तुमचे लक्ष नेहमी धनाकडे जाईल आणि देवाच्या भक्तीमध्ये मन लागणार नाही.