बाथरूम, देवघराच्या या / बाथरूम, देवघराच्या या गोष्टी सदैव ठेवा लक्षात, अन्यथा कधीच दूर होणार नाही दारिद्र्य

दिव्य मराठी वेब टीम

Nov 30,2018 12:06:00 AM IST

रिलिजन डेस्क - हिंदू घरांमध्ये देवघर अवश्य असते. जर हे देवघर वास्तुशास्त्राच्या नियमात असेल तर, याचा शुभ प्रभाव आपल्या कुटुंबावर पडतो. घरातील देवघराची मांडणी ही दोषपूर्ण असल्यास त्या घरातील व्यक्तींना अनेक प्रकारच्या आर्थिक, मानसिक अशांतीचा सामना करावा लागतो. येथे देवघराशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. या छोट्या-छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास पूजेचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये धन-धान्याची कमतरता भासत नाही.


देवघराच्या जवळपास बाथरूम किंवा शौचालय नसावे -
- घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा ठिकाणांपासून देवघर दूर ठेवावे. ज्या लोकांच्या घरात बाथरूमजवळ देवघर असेल त्यांनी देवघराची जागा लगेच बदलावी. हे शक्य नसल्यास बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा.
- या गोष्टीकडे लक्ष न डोळ्यास नकारात्मकता वाढते आणि दरिद्रता घराकडे आकर्षित होते. देवी-देवता अशा घरात निवास करत नाहीत. यामुळे गरिबीला सामोरे जावे लागते.


पुढे जाणून घ्या, इतर कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे...2. देवघरापर्यंत पोहोचावा सूर्यप्रकाश घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.

3. देवघरात घेऊन जाऊ नयेत या वस्तू घरामध्ये ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. देवघरात मृतक आणि पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पुजेशी संबंधित सामानच ठेवावे.

4. पूजन सामग्रीशी संबंधित खास गोष्टी पूजेमध्ये शिळे, सुकलेले फुल-पान अर्पण करू नये. स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा. या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशीचे पान आणि गंगेचे पाणी कधीही शिळे मानले जात नाही. त्यामुळे यांचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो. इतर सामग्री ताजीच असावी. एखाद्या फुलाचा वास घेतला असेल किंवा ते खराब झाले असेल तर देवाला अर्पण करू नये.

5. दररोज रात्री देवघरावर पडदा टाकावा दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघर पडदा टाकून झाकावे. ज्याप्रकारे आपल्याला झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही, ठीक त्याच भावनेने मंदिरावर पडदा टाकावा.
X
COMMENT