आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मच्छीमारांच्या गावात सुधारणांचा पाया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने काही निवडक ठिकाणे निवडली अाणि न्यायपालिकेसह साऱ्या संस्थांना उद्दिष्टपूर्ती हाेईपर्यंत अापले संपूर्ण समर्थन देण्यासाठी प्रेरित केले तर काहीही अशक्य असे नाही. विकासाचे हे माॅडेल देशाच्या अन्य भागातही लागू करण्यास अधिक उपयुक्त ठरू शकते. 

चिनी साहित्य अाता कित्येकांच्या घरात पाेहाेचले अाहे. कित्येक भारतीयांच्या नित्याच्या पूजेतदेखील चिनी बनावटीच्या वस्तू अाढळतात. चीनमध्ये बनवलेल्या अनेक प्रकारच्या उत्पादनांचा वापर घराेघरी हाेत असताे. हा चीनच्या अार्थिक चमत्काराचा परिणाम अाहे, जाे शेकाेऊ या लहानशा गावात सुरू झाला. त्यास अाता शेनजेन म्हणून संबाेधले जाते. 

हे शहर अाणि सारे चीनदेखील अार्थिक सुधारणावादाचा ४० वा वर्धापनदिन साजरा करत अाहे. ज्याची सुरुवात १९७९ मध्ये झाली हाेती. या सुधारणावादाने चीनला अमेरिकेनंतर जगातील दुसरी सर्वात माेठी अर्थव्यवस्था बनवले. देशातील दाेनतृतीयांश गरिबांच्या घरातील दारिद्य्र घालवले. भारतात अार्थिक सुधारणावादाला त्यानंतर बऱ्याच उशिराने म्हणजे १९९१ मध्ये सुरुवात झाली. 

 

शेनजेन अनेक कारणांमुळे अनाेखे शहर ठरते. येथील लाेकसंख्येचा विचार करता जगातील सर्वाधिक तरुणाई येथे पाहायला मिळते. या शहराच्या लाेकसंख्येचे सरासरी वय ३३ इतके अाहे. यामुळेच बहुतेक तरुण अायटी अाणि तंत्रज्ञानाशी जाेडले गेले अाहेत. या उद्याेगात तंत्रज्ञान अाणि विज्ञानात अाधुनिक शिक्षण प्राप्त केलेल्या पदवीधर तरुणांना माेठी मागणी अाहे. अार्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र ठरलेल्या शेनजेनची तुलना अमेरिकेतील सिलिकाॅन व्हॅलीसाेबत केली जाते. कारण येथे राेबाेटिक्स, ड्राेन, कृत्रिम बुद्धिमत्ता अाणि इंटरनेट अाॅफ थिंग्ज (अायअाेटी) सारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील सर्वात माेठे संशाेधन केंद्र म्हणून अाकाराला अाले अाहे. 

 

शेनजेन येथील स्थानिक उद्याेजक अाणि भारतीय रेस्टाॅरंटचे मालक सनी गुप्ता याविषयी माहिती देताना म्हणाले, 'शेनजेन अापली संशाेधनाची भावना, कामगारांच्या कामाविषयी कठाेर मूल्ये अाणि व्यवसाय करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या सुविधा, याेजना यामुळे सारी स्वप्ने वास्तवात साकारताे अाहे.' खरा सुधारणावाद तर चिनी नेते डेंग झियाअाेपिंग यांनी जुलै १९७९ मध्ये शेनजेनचा दाैरा केल्यानंतर सुरू झाला हाेता. साम्यवादी साच्यामध्ये भांडवलवादी विचारधारा एकाएकी साऱ्या देशभर लागू करण्याएेवजी त्याची अंमलबजावणी सर्वप्रथम शेनजेनमध्ये करून पाहावी, असा निर्णय त्यांनी घेतला हाेता. अशा पद्धतीने शेनजेन सुधारणावादाची प्रयाेगशाळा ठरली. 

 

एखाद्या स्थानाच्या संपूर्ण संपदेचा संकेत देणारी जीडीपी १९७९ च्या ३.२ काेटी डाॅलरवरून १० हजार पटींनी वाढून अाज ३४४ अब्ज डाॅलर झाली अाहे. शेनजेन शहराच्या जीडीपीच्या अाकारमानाचा विचार करता २०० वर्षांचा इतिहास असलेल्या हाँगकाँगला त्याने मागे टाकले अाहे. 


शेनजेनमधील कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख वांग विजाेंग यांनी अलीकडेच सांगितले की, शेनजेनचे यश हे सिद्ध करते की, अार्थिक सुधारणावाद अवलंबणे अाणि अर्थव्यवस्था मुक्त करणे हाच मजबूत अाणि संपन्न राष्ट्रनिर्मितीचा एकदम याेग्य मार्ग अाहे. 

 

शेनजेन सांख्यिकी ब्युराेच्या माहितीनुसार शहरात १.२० काेटींपेक्षाही अधिक लाेक राहतात. ज्यांचे सरासरी वयाेमान हे ३३ वर्षे अाहे. येथे बायाेटेकपासून अॅडव्हान्स्ड इलेक्ट्राॅनिक्सपर्यंत ११ हजार राष्ट्रीय हायटेक उद्याेग अाहेत. टेन्सेंट, हुअावेई अाणि झेडटीईसारख्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांनी येथे मुख्यालय सुरू केले अाहे. याशिवाय हे शहर अाता शिक्षण अाणि अार्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात नवे प्रयाेग करत अाहे. जगभरातील प्रतिभावंतांची मांदियाळी शेनजेनमध्ये दाटत अाहे. जेणेकरून सुस्थापित उत्पादक-निर्माते अाणि वाहतुकीचे जाळे, हाँगकाँगसारख्या वित्तीय सेवांचा शेजार, सुयाेग्य राहणीमान अाणि बीजिंग तसेच शांघायच्या तुलनेत दर्जेदार हवामानाचा लाभ येथे घेतला जाऊ शकताे. शेनजेनची सध्याची समृद्धी लक्षात घेता काही दशकांपूर्वी मासेमारी करणाऱ्यांचे हे एक भकास गाव हाेते, यावर काेणाचा विश्वासही बसणार नाही. डेंग झियाअाेपिंग यांनी जेव्हा अार्थिक सुधारणांची प्रक्रिया सुरू केली तेव्हा त्यांनी शेनजेनला अशा एका स्थानाच्या रूपात निवडले, ज्यास विशेष अार्थिक क्षेत्राचा दर्जा देण्यात यावयाचा हाेता. देशातील अन्य ठिकाणांवर सरकारी नियंत्रणे अाहेत अाणि हाेती. मात्र शेनजेन हे ठिकाण सरकारी नियंत्रणातून मुक्त असणारे ठिकाण ठरणार हाेते. डेंग यांच्या मास्टर प्लॅननुसार १४ अाैद्याेगिक संकुलांची (क्लस्टर) उभारणी करण्यात अाली. यामध्ये विविध प्रकारच्या उद्याेगांचा अंतर्भाव करण्यात अाला हाेता. त्या प्रत्येक उद्याेगासाठी याेग्य अाणि अनुरूप पायाभूत अाराखडा तयार करण्यात अाला. 


अर्थातच या प्रक्रियेचा सुरुवातीचा काळ खडतर असाच हाेता. उद्याेगांची उभारणी हाेण्यापूर्वी त्याचा जामानिमा तयार करणाऱ्या कामगारांसाठी खाद्यान्नाचा तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शेती कसणाऱ्या सुमारे ३०० गावांनी केला. त्यानंतर सरकारने महामार्ग, बस काॅरिडाॅर अाणि एक सब-वे अादींसारख्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी विशेष माेहीम सुरू केली. बुलेट ट्रेन, जलवाहतूक अाणि एक नवे विमानतळ उभारले. हे विमानतळ साऱ्या जगाशी जाेडलेले अाहे. 


भारतातील लाेक तक्रार करतात की, लाेकशाही प्रणाली जलद गतीने निर्णय घेण्यातील माेठा अडसर ठरते. भलेही निर्णय घेतला तरी त्यावर अढळ राहणे अाणि कालबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणे त्याहून अधिक कठीण असते. त्यामुळेच मुक्त व्यापार क्षेत्राची संकल्पना उदयास अाली. याचा उद्देश उद्याेगांना विकसित हाेण्यासाठी मदत करणे हा हाेता, जेणेकरून ते लालफीतशाहीच्या अडचणींच्या विळख्यात अडकून पडणार नाहीत. अर्थव्यवस्था अाणि तंत्रज्ञानाच्या पातळीवरील संशाेधनातून प्रगती साधत देशाला अधिक प्रगतिशील बनवण्याचा प्रयत्न हाेईल, अशी अपेक्षा त्यामागे हाेती. शेनजेन या बाबीचे उत्तम उदाहरण ठरते की, सरकारने काही निवडक ठिकाणे निवडली अाणि न्यायपालिकेसह साऱ्या संस्थांना उद्दिष्टपूर्ती हाेईपर्यंत अापले संपूर्ण समर्थन देण्यासाठी प्रेरित केले तर काहीही अशक्य असे नाही. विकासाचे हे माॅडेल देशाच्या अन्य भागातही लागू करण्यास अधिक उपयुक्त ठरू शकते. 

बातम्या आणखी आहेत...