Home | Maharashtra | Mumbai | Vayu cyclone has changed the way in Gujarat, but the hazard persists; high alert for 48 hours

गुजरातमध्ये ‘वायू’ने बदलला मार्ग, पण धोका कायम; ४८ तासांसाठी हाय अलर्ट, मुंबईत मोठ्या लाटांची शक्यता

दिव्य मराठी नेटवर्क, | Update - Jun 14, 2019, 09:15 AM IST

मुंबईहून ४०० उड्डाणे रद्द, ८६ रेल्वे गाड्या रद्द, ५६० गावांत वीजपुरवठा झाला ठप्प

 • Vayu cyclone has changed the way in Gujarat, but the hazard persists; high alert for 48 hours
  छायाचित्र पोरबंदरचे आहे, तेथे २० फूट उंच लाटा आल्या. उना येथेही १५ फूट उंच लाटा दिसल्या. फोटो: दिव्य भास्कर

  अहमदाबाद/मुंबई - गुजरातकडे निघालेल्या ‘वायू’ या चक्रीवादळाबद्दल थोडे दिलासादायक वृत्त आहे. १३५ ते १४५ किमी प्रति तास वेगाने येत असलेल्या या वादळाने दिशा बदलली आहे. हवामान विभागानुसार,‘वायू’ने मार्ग बदलल्याने ते गुजरात किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता नाही. तरीही राज्याच्या किनारपट्टी भागांसाठी वादळ धोकादायकच आहे. लोकांना समुद्रापासून दूर राहण्यास सांगितले आहे. गुजरातमध्ये पुढील ४८ तास हाय अलर्ट राहील. एका अधिकाऱ्यानुसार, ‘वेगवान वारे, वादळ आणि पावसाचा धोका कायम आहे. वादळाचा मध्य भाग गुजरात किनाऱ्यापासून थोडा दूर झाला आहे, पण त्याचा व्यास ९०० किमीपेक्षा जास्त आहे.’ सरकार व आपत्ती व्यवस्थापनाने १५ जूनपर्यंत लोकांना सावध राहण्यास सांगितले आहे. पश्चिम रेल्वेने ७० गेल्वे गाड्या रद्द केल्या, तर २८ चे अंतर कमी केले. वेरावळ मासेमार संघाचे अध्यक्ष अनवर हुसैन यांनी सांगितले की, ३५ वर्षांनंतर लाटा २० फुटांपर्यंत उंच गेलेल्या दिसल्या. वेरावळमध्ये ४५ नौकांचे नुकसान झाले आहे.

  सौराष्ट्राच्या सागरी भागातून १२०० नौकांतून ८ हजार मासेमारांना सुरक्षित बाहेर काढले

  अखिल भारतीय मासेमार संघाचे अध्यक्ष वेलजीभाई मसानी यांनी सांगितले की, वेळीच इशारा जारी केल्यामुळे सौराष्ट्र भागाच्या समुद्रातून ८००० मासेमारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. एका अंदाजानुसार, सुमारे १२०० नौका समुद्रात गेल्या आहेत.

  सोमनाथ मंदिर बंद नाही, आरती झाली

  गुजरातचे सोमनाथ मंदिर बंद करण्यात आले नाही. तेथे धार्मिक अनुष्ठान सुरूच राहतील. गुजरात सरकारच्या मंत्र्यानेही मंदिर प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

  गर्भवती महिलांना वाचवले
  २० गर्भवती महिलांना रुग्णालयात सुरक्षित पोहोवण्यात आले. चौघींनी मुलांना जन्म दिला. जफराबादमध्ये बेटावर अडकलेल्या महिलेलाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

  ७५ बचाव पथके, 300 कमांडो तैनात

  > एनडीआरएफची ५२, एसडीआरएफची ९ पथके, एसआरपीच्या १४ कंपन्या,३०० नौदल कमांडो, ९ हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. दोन विमानेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

  मुंबईत मोठ्या लाटांचा इशारा

  > मुंबईत मोठ्या लाटांचा इशारा देण्यात आला. १४ फूट उंच लाटा येण्याची शक्यता.
  > ४०० उड्डाणे रद्द केली आहेत. मुंबईच्या विमानतळावरून ९०० विमानांचे उड्डाण होते.

  फनीनंतर दुसरे भीषण वादळ
  ओडिशाच्या किनाऱ्यावर मेमध्ये फनीनंतर भारतात हे दुसरे मोठे वादळ आहे. फनीचा फटका ओडिशाच्या १ लाख ६४ हजार कुटुंबातील पाच लाख लोकांना बसला होता.

Trending