वढेरा सहकार्य करत नसल्याचे ताब्यात घेऊन चौकशीची गरज : ईडी

Mar 20,2019 10:30:00 AM IST

नवी दिल्ली

दिल्लीच्या विशेष न्यायालयाने काँग्रेसचे सरचिटणीस रॉबर्ट वढेरा यांच्या अंतरिम जामीनाचा कालावधी २५ मार्च पर्यंत वाढवला आहे. वढेरा यांनी तपासात सहकार्य करावेे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तत्पूर्वी दक्षता संचालनालयाने (ईडी) वढेरा तपासात सहकार्य करत नसल्याचे नमूद केले होते.
वढेरा यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज ईडीने न्यायालयासमोर व्यक्त केली होती. लंडनमधील संपत्तीच्या खरेदीत मनी लाँड्रिंग प्रकरणाचा ईडी तपास करत आहे. विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयासमोर वढेरा यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. १६ फेब्रुवारी रोजी अंतरिम जामीन मिळाला होता. वढेरा यांच्यावर लंडनच्या १२ ब्रायंस्टन स्क्वेअर येथील मालमत्तांच्या खरेदी व्यवहारात मनी लॉँड्रिंगचाही आरोप आहे. लंडनमधील अनेक मालमत्तांच्या खरेदी माहिती मिळाली आहे. त्यात दोन घरे, सहा फ्लॅट व इतर मालमत्तांचाही समावेश आहे.
X