• Home
  • Gossip
  • Veena Malik has questioned saniya mirza about taking her baby boy to the hookah bar Saniya answered wisely

Bollywood / वीना मलिकने केला मुलाला हुक्का बारमध्ये घेऊन जाण्याबद्दल प्रश्न, सानिया म्हणाली - 'तुझ्यापेक्षा जास्त मला माझ्या मुलाची काळजी आहे'

यावर सानियाने दिले सडेतोड उत्तर... 

दिव्य मराठी वेब

Jun 18,2019 03:29:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : सानिया मिर्जा आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक यांच्यामध्ये ट्विटर वॉर झाले. याची सुरुवात वीनाने केली, जिने एक व्हिडीओ पाहून काही दिवसांपूर्वीच आई झालेल्या सानियाच्या संगोपनावरच प्रश्न केला. झाले असे की, इंडिया-पाकिस्तानच्या वर्ल्ड कप मॅचपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सानिया आपला पती शोएब मलिक आणि 7 महिन्यांचा मुलगा इजहानसोबत एका रेस्तरॉमध्ये बसलेली दिसली. वीनाने या व्हिडीओमध्ये सानियाला टॅग करून लिहिले, 'सानिया, मला मुलासाठी काळजी वाटते आहे, तुम्ही लोक त्याला शीशा प्लेस म्हणजेच हुक्का बारमध्ये कसे घेऊन गेलात. हे खूप भयावह आहे.'

सानियाने दिले सडेतोड उत्तर...
सानियाने ट्विटरवर वीनाला उत्तर देत लिहिले, 'वीना मी मुलाला शीशा लाउंजमध्ये घेऊन नाही गेले. हे तुझ्या किंवा इतरांच्याही गरजेची गोष्ट नाही आणि इतरांपेक्षा सर्वात जास्त मला माझ्या मुलाची काळजी आहे. दुसरी गोष्ट मी पाकिस्तान क्रिकेट टीमची डायटीशियन किंवा त्यांची आई, प्रिंसिपल किंवा टीचरदेखील नाही.'

X
COMMENT