आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीर तंट्या भिल आदिवासी स्वातंत्रलढयातील एक मोठे क्रांतिकारी- आमदार शिरिषकुमार नाईक

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

निलेश पाटील

नवापूर- मराठीशाहीचा अस्त झाल्यानंतर त्या काळात सातपुडातील बहादूर भिल्लांनी अनेक वर्ष गनिमी काव्यानं इंग्रजांशी झुंज दिली. ह्यात सातपुड्यातील वीर तंट्या भिल्लाचा संघर्ष हे भारतीय स्वातंत्र लढ्यातील महत्त्वाची भुमिका राहिली आहे. असे नवापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरिषकुमार नाईक यांनी व्यक्त केले. ते नवापूर येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जननायक तंट्या भिल यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रतनजी गावित, पंचायत समिती सदस्य जलामसिंग, ईश्वर गावित, शरद मावची, नवलसिंग गावित आदि आदिवासी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे आमदार नाईक म्हणाले की, भारतीय स्वातंत्र लढ्याच्या इतिहासाप्रमाणे या आदिवासी भिल्ल क्रांतिकारकांचा इतिहासदेखील महत्वाचा आहे, जो बाकीच्या क्रांतिकारकां प्रमाणे सगळ्यांच्या पुढे आला नाही. 


बलाढ्य ब्रिटिश सत्तेला सतत अकरा वर्षे सळो कि पळो करणारे हे क्रांतिकारक दुर्लक्षितच राहिले व त्यांना ब्रिटिश सत्तेने कायम दरोडेखोर याच दृष्टिकोनातून बघितले. ब्रिटिशाना सतत 11 वर्ष हुलकावणी देणारा हा क्रांतिवीर 150 वर्षांपूर्वी आदिवासी व शेतकऱ्यांना, सावकार, मालगुजार आणि जुलमी सरकार विरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देणार जननायक तंट्या भिल नेहमी स्मरणात राहतील. 
दुर्दैवाने इतिहासात तंट्या भिल यांची नोंद एक डाकू व दरोडेखोर अशीच झाली आहे. इतिहास लिहिणाऱ्यांनी गुन्हेगार जातीत जन्मलेल्या तंट्या भिल्लांवर हा अन्याय केला. महाराष्ट्रातील लोककथा, लोकनाट्य, पोवाडे आणि लोकगीतातही तंट्या भिल लोकांसमोर येत होते.तेही एक डाकू आणि दरोडेखोर हा कपाळावर डाग घेऊनच. एक दशकभर हा क्रांतिवीर बेदखल राहिला त्याची हि एकाकी झुंज आदिवासी स्वातंत्रलढयातील एक मोठे क्रांतिकारी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद मावची यांनी केले.