बॉलिवूडच्या या अॅक्ट्रेसलाही / बॉलिवूडच्या या अॅक्ट्रेसलाही अंडरवर्ल्ड डॉनने दिली होती one night stand ची ऑफर, 30 वर्षांपासून आहे बेपत्ता

Nov 25,2018 12:03:00 AM IST

एंटरटेनमेंट डेस्क - मल्याळम चित्रपटातील सेलिब्रिटी नेहा सक्सेनाने दुबईतील एका अब्जाधीशाला सोशल मीडियावर सर्वासंमोर उघडे पाडले आहे. तिला या अब्जाधीशाने दुबईत येऊन एक रात्र घालवण्याची ऑफर दिली होती. अभिनेत्री नेहाच्या या धाडसाचे चांगलेच कौतुक होत आहे. परंतु, सर्वच अॅक्ट्रेस असे धाडस करत नाहीत. 80 च्या दशकात भूताटकी चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवलेली अॅक्ट्रेस जॅस्मीन त्यापैकीच एक होती. तिला एका अंडरवर्ल्ड डॉनने वन नाइट स्टँडची ऑफर दिली होती.


1988 मध्ये रामसे ब्रदर्स यांच्या 'वीराना' चित्रपटातील भूत जॅस्मिनच्या सौंदर्याने अनेक जणांना घायाळ केले होते. आज लोकांमध्ये जी क्रेझ सनी लियोनसाठी आहे, तीच त्या काळातील तिच्या चाहत्यांमध्ये होती. काहींच्या मते, वीराना चित्रपटाच्या रिलीझनंतर जॅस्मिनला अंडरवर्ल्डमधून फोन येत होते. ज्यात अनेकजण वाईट उद्देशाने जॅस्मिनला भेटण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे घाबरलेल्या जास्मिनने केवळ बॉलिवूडच नव्हे, तर देश सुद्धा सोडला. गेल्या 30 वर्षांपासून जॅसमीन कुठे आहे याचा कुणालाही पत्ता नाही. किमान ती जिवंत तरी आहे का असा प्रश्न आजही तिचे चाहते विचारतात.


कोण होती जॅस्मिन आणि सध्या कुठे आहे..?
निर्माता-दिग्दर्शक एन.डी.कोठारी यांनी 1979 साली आलेला चित्रपट ‘सरकारी मेहमान’मध्ये जास्मिनला प्रेक्षकांसमोर आणले होते. या चित्रपटात विनोद खन्ना आणि अमजद खान यांच्या भूमिका होत्या. कोठारीने यानंतर 1984 साली डायवोर्स हा चित्रपट बनविला आणि त्यातही जॅस्मिनला घेतले. जास्मिनची खरी ओळख वीराना चित्रपटातील तिच्या भुताच्या रोलमुळे झाली. या चित्रपटात विजयेंद्र घाटगे, शर्मिला टैगोर आणि गिरीश कर्नाडही होते.


आता कुठे आहे जास्मिन, 'वीराना' रिलीज झाल्यावर काय घडले असे...
असेही म्हटले जाते, की 'वीराना' रिलीज झाल्यानंतर जॅस्मिनला अंडरवर्ल्डमधून कॉल येत होते. यामुळे नंतर तिने चित्रपटात काम केले नाही. यानंतर जॅस्मिन अमेरिकाला निघून गेली आणि तिथेच सेटल झाली. असेही म्हणतात की, जास्मिन सध्या जॉर्डन येथे राहते. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्मिन आता जिवंतही नाही.


नावाबद्दलही होता सस्पेंस
1979 साली चित्रपटात येण्यापूर्वी जॅस्मिन काय करत होती हेसुद्धा कोणाला माहीत नाही. असे म्हणतात की, जॅस्मिनचे पूर्ण नाव जॅस्मिन भाटिया होते तर काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे नाव जॅस्मिन धुन्ना होते.

X