आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Veeru Devgn Passes Away : Kajol Crie So Much Aishwarya And Abhishek Make Her Cool Down And Stop Crying

वीरू देवगण यांचे निधन : सासऱ्यांच्या अंतिम दर्शनाच्यावेळी ऐश्वर्याला आलिंगन देऊन खूप रडली काजोल, अभिषेकने केले सांतवन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क- अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचा अंतिम संस्कार सोमवारी संध्याकाळी विले पार्ले येथील स्मशान भूमीत करण्यात आला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोल, ऐश्वर्या रायला आलिंगन देऊन खूप रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ वीरू देवगण यांच्या अंतिम क्षणांचा आहे. ऐश्वर्या, पती अभिषेकसोबत देवगण कुटुंबाचे सांतवन करण्यासाठी पोहोचली होती. काजोलला रडताना पाहून अभिषेक तिला थोपटतानाही दिसत आहे.  

 

अमिताभ बच्चन यांनी केली वीरू यांची अंतिम पाठवणी... 
वीरू देवगण यांचे निधन सोमवारी सकाळी सांताक्रूज येथील सूर्य रुग्णालयात कार्डिअॅक अरेस्टमुळे झाले. संध्याकाळी जेव्हा त्यांची अंतिम यात्रा काढली गेली तेव्हा अमिताभ बच्चनदेखील यामध्ये सामील झाले होते. यांच्याव्यतिरिक्त सुनील शेट्टी, अनिल कपूर, रितेश देशमुख, विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत, तुषार कपूर आणि रंजीत यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलेब्स वीरू यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते

बातम्या आणखी आहेत...