आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅसवर ठेवली भाजी, अचानक धूर आला, क्षणात गॅसचा स्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई -  गॅसवर वरण, भाजी शिजवण्यासाठी  ठेवली होती. मात्र शेजारच्या महिलेने अावाज दिल्याने बाेलण्यासाठी ज्याेती वाव्हळ घराच्या बाहेर अाल्या. दरम्यान घरातील इतर सदस्य बाहेर होते. अचानक घरातून धूर निघाल्याने त्या घाबरल्या आजूबाजूचे  शेजाऱ्यांना याची माहिती दिली आणि दहा मिनिटातच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या  तीव्रतेने  राक्षसभुवन हादरून गेले. स्फोटामुळे वाव्हळ यांच्या मातीच्या घराच्या भिंती पडल्या. तर घरावरील पत्रे उडून बाजूला पडले. घरातील धान्य, कपडे,  संसाराेपयोगी साहित्य जळून  खाक झाल्याने संसार उघड्यावर आला आहे.      


ही घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील बाबासाहेब कांतीलाल वाव्हळ यांच्या घरी   रविवारी (दि .१८)  दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.  ज्रूोती वाव्हळ, एक दोन वर्षांचा मुलगा व गौतम वाव्हळ या घटनेत बालंबाल वाचले आहेत.   अल्प शेती असल्याने वाव्हळ कुटुंबातील   सदस्य मजुरी करतात.  रविवारी (दि १८)  दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास  ज्योती वाव्हळ  यांनी गॅस शेगडीवर वरण-भाजी ठेवली अन् त्या घराच्या बाहेर येऊन शेजारी असलेल्या महिलांशी बाेलत थांबल्या. काही वेळात घरातून अचानक धूर येताना दिसला याची माहिती ज्याेती वाव्हळ यांच्यासह इतर महिलांनी काॅलनीतील नागरिकांना दिली. गॅसचा वास येत असल्याने नागरिक  पळत सुटले. काही वेळातच  गॅस सिलिंडरचा माेठा स्फोट झाला.   वाव्हळ यांचे पत्र्याचे घर उद्ध्वस्त झाले. या दुर्घटनेत त्यांच्या घरातील सर्व संसाराेपयाेगी साहित्य जळून खाक झाले.  या घटनेत आसपासच्या घरांनाही  हादरे बसले.  उमापूर पोलिस चौकीचे फौजदार विजय जोगदंड , पोना मुकुंद एकशिंगे अादी पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

बातम्या आणखी आहेत...