मुंबई / मुंबई / भाजी खरेदी करण्यासाठी मोलभाव करत होता ग्राहक; भाजीविक्रेत्याने 10 रुपयांसाठी ग्राहकावर चाकूने केला हल्ला

आरोपीने ग्राहकाच्या गळ्यावर चाकूने केले अनेक वार 
 

दिव्य मराठी वेब

Jun 25,2019 02:37:53 PM IST

मुंबई - दादर भागात 10 रुपयांच्या वादावरून भाजीविक्रेत्याने एका ग्राहकाची हत्या केली. सोनी लाल महंतो असे आरोपीचे नाव आहे. ग्राहक भाजी घेताना विक्रेत्यासोबत भाव करत होता. रागाच्या भरात भाजीविक्रेत्याने त्याची गळा चिरून हत्या केली.


पोलिसांच्या मते, सोमवारी रात्री मोहम्मद हनीफ नावाचा व्यक्ती दादरमध्ये भाजी घेण्यसाठी गेला होता. दरम्यान त्याचे एका भाजीविक्रेत्याशी 10 रूपयांसाठी भांडण झाले. वाद इतका विकोपाला गेला की भाजीविक्रेत्याने हनीफवर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात हनीफ गंभीर झाल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला.


मानेवर होत्या जखमांच्या खुना
हनीफच्या मानेसह शरीरावर अनेक ठिकाणी चाकूने हल्ला केल्याचे निशान होते. घटनेची माहिती मिळता. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमीला सरकारी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. शिवाजी नगर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

X
COMMENT