आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे कच्च्या भाज्या आणि फळे खाणे ठरते फायदेशीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, शिजवलेले, प्रक्रिया केलेले आणि बंद पकिटातील अन्ऩ खाण्यापेक्षा कच्च्या भाज्या आणि फळे खाणे मानसिक आरोग्यासाठी उत्तम असतात. शिजवल्यामुळे अन्नामधून व्हिटॅमीन सी आणि पचनासाठी उपयुक्त असणारे घटक निघून जातात. तुम्ही भाज्या खाता का? या प्रश्नाचं प्रत्येकाचं उत्तर हे 'हो' असच असेल…मात्र तुम्ही कच्च्या भाज्या आणि फळं खाता का? हा प्रश्न तुम्हाला थोडा विचित्र वाटेल…तुम्ही म्हणाल भाजी शिजवल्याशिवाय कशी खाणार? मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, कच्च्या भाज्या खाणं हे फक्त शारीरिक आरोग्यासाठी नव्हे तर मानसिक आरोग्यासाठी देखील उपयुक्त असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे.  यासाठी संशोधकांनी २८ ते २५ वयोगटातील व्यक्तींची माहिती घेतली. या व्यक्तींना त्यांचा आहार, शारीरिक हालचाल आणि बॉडी मास इंडेक्सबाबत प्रश्न विचारले. संशोधनातून असे लक्षात आले की, कच्च्या भाज्यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावात सकारात्मक बदल होत होता. या फळे आणि भाज्यांमध्ये गाजर, केळी, सफरचंद, काकडी, किवी, टोमॅटो, कोबी, कांदा यांचा समावेश होता. हे संशोधन जर्नल फ्रंटियर्स इन सायकाॅलॉजीमध्ये प्रसिद्ध कऱण्यात आलंय. संशोधकांच्या सांगण्यानुसार, आम्ही केलेल्या संशोधनातून असे स्पष्ट झालेय की, कच्च्या भाज्या आणि फळे खाल्ल्याने डिप्रेशन आणि ताणतणाव याची लक्षणे कमी झाल्याचे दिसून आले. तर, व्यक्तींच्या मूडमध्ये सुधारणा झाल्याचे समजले.

बातम्या आणखी आहेत...