आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिटॅमिन K ची कमतरता दूर करतील या तीन भाज्या 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिटॅमिन के हे रक्ताच्या गाठींबरोबरच हाडांच्या मजबुतीसाठीही आवश्यक आहे. काही अशा भाज्या आहेत ज्या आहारात घेतल्याने याची कमतरता भरून काढली जाऊ शकते. 


पत्ताकोबी 
पत्ताकोबीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के असते. याशिवाय यात भरपूर फायबर असते. एक कप पत्ताकोबीत ५३.२ मायक्रोग्रॅम के व्हिटॅमिन असते. याशिवाय फुलकोबीतही व्हिटॅमिन के भरपूर असते. 


पालक : हे लोह आणि व्हिटॅमिन केचा स्रोत आहे. म्हणूनच अॅनिमियाचा त्रास दूर करण्यासाठी पालक ही सर्वात चांगली पालेभाजी असल्याचे म्हटले जाते. पालकात व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असते. त्यामुळेच पालक हाडांसाठीही उपयोगी आहे. अर्ध्या कप पालकात जवळपास ४६९ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन के असते. 


ब्रोकली 
ब्रोकलीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन के असते. यात अनेक प्रकारचे फाइटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. एका कपामध्ये जवळपास २२० मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन 'के' असते. शिवाय यात लोह, प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, क्रोमियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी ही असते. ब्रोकली सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता. 

बातम्या आणखी आहेत...