• Home
  • Business
  • Vehicle sales fall for the tenth month in a row, with sales down 31.37% in August

घसरण / वाहनांच्या विक्रीत सलग दहाव्या महिन्यात घसरण, ऑगस्ट मध्ये विक्रीत ३१.३७% घट

सियामची आकडेवारी घटत्या मागणीने वाहन कंपन्या त्रस्त, विक्री वाढवण्यासाठी ऑफर्सचा मारा

Sep 17,2019 02:45:50 PM IST

नवी दिल्ली : मंदीच्या वाटेवरून मार्गक्रमण करीत असलेल्या वाहन क्षेत्राची ऑगस्ट महिन्यातील विक्रीची आकडेवारी आणखी चिंताजनक आहे. सलग दहाव्या महिन्यात वाहनांची विक्री घटली आहे. ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये ३१.५७ % घट नाेंद झाली आहे. मागील महिन्यात स्थानिक बाजारात एकूण १,९६,५२४ वाहनांची विक्री झाली हाेती. एक वर्षआधी याच कालावधीत २,८७,१९८ प्रवासी वाहनांची विक्री झाली हाेती. साेसायटी ऑफ इंडियन ऑटाेमाेबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) संस्थेने साेमवारी ऑगस्ट महिन्याती वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली. सियामने १९९७- ९८ पासून वाहन विक्रीचे आकडे संकलित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आतापर्यंतची ही सर्वात माेठी घसरण आहे. जुलैमध्येही प्रवासी वाहनांच्या विक्रीत ३१ % घट झाली हाेती, जी गेल्या १९ वर्षांतील सर्वात माेठी घसरण हाेती. ऑगस्टमध्ये प्रवासी, दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांसह सर्व श्रेणीतील वाहनांची एकूण विक्री १८,२१,४९० युनिट्स झाली हाेती. गेल्या वर्षातल्या ऑगस्टमधील २३,८२,४३६ वाहनांच्या तुलनेत ती २३.५५ टक्के कमी आहे. माेटारींची स्थानिक विक्री ४१.०९ % घटली आहे. ऑगस्टमध्ये स्थानिक बाजारात १,१५.९५७ माेटारींची विक्री झाली. गेल्या वर्षात याच कालावधीत हा आकडा १,९६,८४७ हाेता. गेल्या महिन्यात दुचाकींची विक्री वार्षिक आधारावर २२.३३ % कमी झाली. या काळात ९,३७,४८६ वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षाच याच कालावधीत १२,०७,००५ वाहनांची विक्री झाली हाेती. वाहन विक्रीमधील घसरणीतून सावरण्यासाठी कंपन्या आता ऑफरमध्ये कॅश सवलत, एक्सचेंज ऑफर, अॅक्सिडेंट वाॅरंटी सारखे उपाय करीत आहेत.


सर्व श्रेणीतील वाहन विक्रीत घट
सर्व श्रेणी वाहने 23.55%
प्रवासी वाहन 31.57%
प्रवासी माेटारी 41.09%
व्यावसायिक वाहने 38.71%
तीनचाकी वाहने 6.93%
दुचाकी वाहने 22.24%


केंद्र सरकारचे वस्तू अाणि सेवा कराचे स्थिर संकलन
2018

एप्रिल 1,03,459
मे 94,016
जून 95,610
जुलै 96,483
ऑगस्ट 93,960
सप्टेंबर 94,442
ऑक्टाेबर 1,00,710
नाेव्हेंबर 97,637
डिसेंबर 94,726


2019
जानेवारी 1,02,503
फेब्रुवारी 97,247
मार्च 1,06,577
एप्रिल1,13,865
मे 1,00.289
जून 99,939
जुलै 1,02,000
ऑगस्ट 98,202


जीएसटीमधील कपात किती प्रभावी
मागणी घटल्याने त्रस्त झालेल्या वाहन क्षेत्राकडून सातत्याने जीएसटी कमी करण्याची मागणी हाेत आहे. या क्षेत्रावर सध्या २८% जीएसटी आहे. ताे १८ % करण्याची मागणी आहे. २० सप्टेंबरला हाेणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. तज्ञांच्या मते जीएसटी कपात तात्पुरती दिलासा देणारी आहे. सरकारचे जीएसटी संकलन आता स्थिर आहे. अशा वेळी सरकारसमाेर आर्थिक समस्या येऊ शकते. सरकारने जीएसटी कमी केला तर अन्य क्षेत्रेही मागणी करतील.


सातत्याने विक्री घटल्याने जीएसटी कपात करण्याची वाहन क्षेत्राची मागणी
2018 : 2019 : (एकूण विक्री)
ऑगस्ट : 18,21,490 : 23,82,436 : -23.55
जुलै : 2,245,223 : 1,825,148 : -18.7
जून : 2,279,186 : 1,997,952 : -12.3
मे : 2,283,262 : 2,002,096 : -8.6
एप्रिल : 2,380, : 294 : 2,001,096 : -15.9


सूट दिल्यास केंद्रावरचा भार वाढणार
जीएसटी परिषदेची २० सप्टेंबरला गाेव्यामध्ये बैठक हाेत आहे. बैठकीत वाहन क्षेत्रावर लावण्यात आलेला २८ % जीएसटी कमी करून १८ % केला जाण्याची आशा आहे. वाहन क्षेत्राला सूट दिल्यास सरकारवरचा भार जवळपास ३० हजार काेटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. काेटक इन्स्टिट्युट इक्विटीजच्या अहवालात वाहन क्षेत्राला १० % सूट दिली तर सरकारवर यामुळे ४५ हजार काेटी रुपयांचा भार पडण्याचा अंदाज व्यक्त केला.

X