सलग तीन महिने / सलग तीन महिने घसरणीनंतर प्रवासी वाहन विक्रीमध्ये1.5% वाढ, अॉक्टोबरमध्ये 2.84 लाख गाड्यांची विक्री

वृत्तसंस्था

Nov 11,2018 10:17:00 AM IST

नवी दिल्ली - सलग तीन महिने घसरण नोंदवण्यात आल्यानंतर प्रवासी वाहन विक्रीमध्ये तेजी नोंदवण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये हा अाकडा १.५५ टक्क्यांनी वाढून २,८४,२२४ नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी समान महिन्यात २,७९,८७७ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. याआधी जुलै महिन्यात ९ महिन्यांत पहिल्यांदाच वाहनांच्या विक्रीमध्ये घट नोंदवण्यात आली होती. भारतीय वाहन उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना सियामच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. प्रवासी वाहनांमध्ये कार, युटिलिटी वाहने आणि व्हॅनचा समावेश आहे. सियामचे महासंचालक विष्णू माथुर यांनी सांगितले की, ‘अॉक्टोबरमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत सकारात्मक वाढ दिसून आली.

यात गेल्या वर्षी कमी विक्रीचाही परिणाम आहे. याव्यतिरिक्त विमा, इंधन दरवाढ आणि शेअर बाजारात घसरण झाल्याचाही परिणाम झाला आहे.’ दिवाळीतील मागणीबाबत पुढील महिन्यात चित्र स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विक्रीत ७-९ टक्के वाढीचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

मोटारसायकल : हीरो मोटोकॉर्पने १८.८३% वाढीसह ६.४२ लाख, बजाज ऑटोने ३३.१% वाढीसह २.८१ लाख वाहनांची विक्री केली.

स्कूटर : होंडाने ९.८९% वाढीसह ३,२२,११५ स्कूटर, तर टीव्हीएसने ४१.४६% वाढीसह १,४५,७३७ स्कूटरची विक्री केली.

मारुतीची ०.६१% जास्त विक्री ऑक्टोबरमध्ये मारुती सुझुकीने १३५,९४८ प्रवासी वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी आॅक्टोबरच्या तुलनेमध्ये ०.६१% जास्त. ह्युंदाईने ४.८७% वाढीसह ५२,००१ गाड्यांची विक्री केली.

X
COMMENT