आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएनजी-डिझेलमिश्रित इंधनावर धावणार वाहने, ड्युअल फ्युएल इंजिन असणाऱ्या वाहनांना मिळणार परवानगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात डिझेलवर चालणारी वाहने आता सीएनजीच्या मिश्र इंधनावरही चालू शकतील. डिझेल, पेट्राेलसह सीएनजी, बायो सीएनजी आणि एलएनजी मिश्र इंधनावर चालणाऱ्या वाहनांना सरकार मंजुरी देण्याच्या तयारीत आहे. याचा फायदा देशातील अडीच कोटी डिझेल वाहनांची मालकी असणाऱ्या लोकांना होऊ शकेल. सरकारच्या वतीने या आठवड्यात दुहेरी इंधन (ड्युअल फ्युएल) इंजिनाला मंजुरी देण्याच्या दृष्टीने अधिसूचना काढण्यात येणार आहे. 

 

एम-१ श्रेणीच्या वाहनांना ड्युअल फ्युएल इंजिन लावण्याची परवानगी असेल. या श्रेणीत ९ किंवा त्यापेक्षा कमी आसन क्षमता असणाऱ्या वाहनांचा समावेश असणार आहे. उदा. सध्या विविध शहरातील गाड्यांमध्ये सीएनजीची रेट्रो फिटिंग असते. त्यामुळे एका वेळी एकच इंधन म्हणजे सीएनजी किंवा पेट्रोलवर गाडी चालत असते. परंतु दुहेरी इंधन इंजिनात मात्र दोन्ही प्रकारचे इंधन एकत्रितपणे खर्च होणार आहे. यामुळे वाहनधारकांचा डिझेलवर होणारा खर्च कमी होईल. २० टक्क्यांपर्यंत खर्च कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच लहान वाहनांपासून होणारे प्रदूषण ४० टक्क्यांनी कमी होऊ शकेल. 

 

६० रुपयांत २५ किलोमीटर प्रवास करणे शक्य 
सध्या एक लिटर डिझेलमध्ये वाहन कमाल २५ किलोमीटरपर्यंत चालते. म्हणजेच एक लिटर डिझेलसाठी किमान ७५ रुपये खर्च करावे लागतात. परंतु दुहेरी इंजिनामुळे ६० टक्के डिझेल आणि ४० टक्के सीएनजी खर्च होईल. डिझेलचा दर ७५ रुपये प्रतिलिटर म्हणजे ६० टक्के डिझेलसाठी ४५ रुपये लागतील आणि ४० टक्के सीएनजीसाठी ४० रुपये प्रतिकिलोप्रमाणे १५ रुपये खर्च होतील. अशा तऱ्हेने दोन्हींचा खर्च एकत्र केल्यास ६० रुपयांमध्ये २५ किलोमीटरचा प्रवास होऊ शकेल. सध्या डिझेल गाड्यांमध्ये मिश्र इंधन वापरले जात नाही. 

 

देशातील वाहनांची संख्या 
२१ कोटी एकूण नोंदणीकृत वाहने 
७ कोटी बस, ट्रक आणि कारची संख्या 
२.५ कोटी डिझेल कार 
६० टक्के कार, ट्रक, बस आणि ट्रॅक्टर डिझेलवर चालतात 
२० टक्के डिझेलचे कार आहेत 

बातम्या आणखी आहेत...