Home | International | Other Country | venezuela blackout news in Marathi

व्हेनेझुएलात 5 लिटर पाण्यासाठी 140 रुपये द्यावे लागतात, लोकांची रोजची कमाई 14 रुपये!

व्हर्जिनिया लोपेझ ग्लास | Update - Apr 11, 2019, 12:44 PM IST

ब्लॅकआऊटमुळे अर्थ व्यवस्थेस दररोज 1400 कोटी रुपयांचा फटका

 • venezuela blackout news in Marathi

  कॅराकस - राजकीय संघर्षामुळे दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देश होरपळून निघाला आहे. सुमारे ३.२ कोटी लोकसंख्येच्या देशाला वीज, पाण्यापासून अन्नाच्या तुटवड्यापर्यंत अनेक समस्यांशी झुंजावे लागत आहे. देशातील २३ राज्यांत ३४ दिवसांपासून वीजपुरवठा नाही. गेल्या एक महिन्यात पाच वेळा ब्लॅक आऊट राहिले.


  वीज नसल्यामुळे पाण्याचे पंपही ठप्प आहे. पाच लिटर पाणी १४० रुपये मोजून घेण्याची वेळ आली आहे. दुर्देव म्हणजे देशातील नागरिकांची सरासरी कमाई केवळ ४२० रुपये आहे. कार्ड पेमेंटची यंत्रेही बंद पडली आहेत. लोकांना खाण्यापिण्याचे पदार्थही खरेदी करणे कठीण बनले आहे. फेब्रुवारीत दूध ५ हजार रुपये लिटर, बटाटे-१७ हजार रुपये किलो . पण एक लिटर पेट्रोलसाठी केवळ ७० पैशांत मिळत होते. सध्या वीज नसल्यामुळे रुग्णालयांतील शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत. व्हेनेझुएलात ७० दिवसांत ४० भूकबळी झाले, असे संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले. खाद्यपदार्थांचा तुटवडा असल्यामुळे लुटालूट सुरू झाली आहे. १२०० हून अधिक मोठे उद्योग केंद्रांची लूट झाली आहे. माराकॅबो या सर्वात मोठ्या शहरात सर्वात जास्त लुटालुटीच्या घटना घडल्या. येथे ५०० उद्योग आस्थापनांची लूट झाली. राष्ट्रपती निकोलस मदुरो व विरोधी नेते जॉन गोइडो यांच्यात संघर्ष आहे. २०१३ पासून मदुरो सत्तेवर आहेत. २०१८ मध्ये ते दुसऱ्यांदा निवडले गेले.


  अमेरिकेचा गोइडोंना पाठिंबा : तेलाच्या साठ्यावर डोळा, आर्थिक निर्बंध लादले
  अमेरिका, ब्राझील, कॅनडा व कोलंबियासह सुमारे ५० देशांनी गोइडो यांना पाठिंबा दिला आहे. गोइडो यांना अटक झाली तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेचा व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यावर डोळा आहे. विद्यमान व मागील सरकारने अमेरिकेला सहकार्य केले नव्हते. त्यामुळे अमेरिकेने त्यांच्यावर अार्थिक निर्बंध लादलेे आहेत.


  रशियाची मदुरोंना मदत : व्हेनेझुएलास १.५ लाख कोटींचे कर्ज दिले
  रशिया, चीन, मेक्सिकोसह १० देशांनी मदुरो सरकारला पाठिंबा दिला आहे. रशियाने व्हेनेझुएलाला १.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. त्याचबरोबर लष्करी मदतही दिली आहे. अमेरिकेने रशियाला सैन्य हटवा, असा इशारा दिला आहे. सिरियात अजूनही अमेरिकी सैन्य तैनात चालत असेल तर व्हेनेझुएलावर आक्षेप का? असा तर्क रशियाने दिला आहे.

Trending