Home | International | Other Country | venezuela currency crisis

1 किलो बटाटे 20 लाख रुपयांना, तर 50 लाखांना किलोभर टमाटे, या देशात अब्जाधीशही आपल्या कुटुंबाचे भरू शकत नाही पोट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 26, 2018, 10:03 AM IST

महागाई काय असते, हे एखाद्याने दक्षिण अमेरिकी देश व्हेनेझुएलातील लोकांना विचारावे.

 • venezuela currency crisis

  इंटरनॅशनल डेस्क - "महागाई काय असते, हे एखाद्याने दक्षिण अमेरिकी देश व्हेनेझुएलातील लोकांना विचारावे. येथे चलनाचे एवढे पतन झालेले आहे की, येथील करोडपतीही दोन वेळच्या अन्नाला मोताद झाला आहे. एक किलो भाजी खरेदी करण्यासाठीही लाखो बोलिव्हर (देशाचे चलन) द्यावे लागत आहेत. परिस्थिती अशी झाली आहे की, बॅगभर नोटा घेऊनही तुम्ही येथे पोटभर पूर्ण कुटुंबाला खाऊ घालू शकत नाहीत.


  20 लाखात किलोभर बटाटे, तर टमाट्यांसाठी द्यावे लागतात 50 लाख
  अतिप्रचंड महागाईचा अंदाज या काही उदाहरणावरून तुम्हाला येईल. येथे एक किलो बटाट्यांची किंमत 20 लाख बोलिव्हरवर गेली आहे, तर टमाटे 50 लाख बोलिव्हर, एक किलो गाजर- 30 लाख बोलिव्हर, एक किलो तांदूळ- 25 लाख बोलिव्हर आणि एक किलो पनीर- 75 लाख बोलिव्हरमध्ये मिळत आहे. दुसरीकडे एक प्लेट नॉनव्हेज थाळी- 1 करोड बोलिव्हरमध्ये मिळत आहे. या देशाची परिस्थिती एवढी बिघडली आहे की, लोक व्हेनेझुएला सोडून शेजारी देश कोलंबियाला पळून जाण्यासा मजबूर झाले आहेत. दुसरीकडे अनेक लोक ब्राझीललासुद्धा जात आहेत.


  का चिघळली परिस्थिती?
  जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने व्हेनेझुएलावर आर्थिक संकट आले आहे. येथील सरकारने गरजेपेक्षा जास्त चलन छापले, यामुळे त्याची किंमत खूप कमी झाली, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उपासमारीची परिस्थिती तयार झाली आहे. या कठीण परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो राजधानी कराकसमध्ये सातत्याने बैठका घेत आहेत. त्यांनी इतर देशांना मदतीचे आवाहनही केले आहे.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video व आणखी Photos...

 • venezuela currency crisis
 • venezuela currency crisis

Trending