आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेनेझुएलात 5 दिवसांपासून अंधार, स्थिती बिघडली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराकस  - राजकीय संकटाशी झुंज देत असलेल्या व्हेनेझुएलात पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ब्लॅकआऊटमुळे स्थिती बिघडली आहे. देशातील २३ राज्यांपैकी १५ राज्यांत अजूनही वीज आलेली नाही. ब्लॅकआऊटमुळे १.३ कोटी लोक त्रस्त आहेत. रुग्णालयांत सर्वात जास्त अडचण होत आहे. गेल्या दोन दिवसांत १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अंधाराचा फायदा घेत गुन्हेगारांनी बाजारांत दुकानांत लूटमार केली आणि लोकांवर हल्ले केले. राजधानी कराकसमध्ये लूटमार आणि चोरीच्या ५०० पेक्षा जास्त घटना झाल्या. 


त्यानंतर आरोपींची धरपकड सुरू झाली. एवढे गुन्हेगार झाले की पोलिस ठाण्यांत जागाच शिल्लक राहिली नाही. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना रस्त्याशेजारीच ताब्यात घेत त्यांना रांगेत झोपवले. शीतगृहांत वीज नसल्याने खाद्यपदार्थ आणि भाज्या सडत आहेत. वीज संकटासाठी राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी अमेरिकेला जबाबदार ठरवले. ते म्हणाले की, अमेरिकेने सायबर हल्ला करून वीज केंद्रांजवळ तोडफोड केली. त्यामुळे ८० टक्के केंद्रे बंद पडली.  


दूध ८० हजार रुपये लिटरपर्यंत पोहोचले
व्हेनेझुएलात चलनाच्या अवमूल्यनामुळे एक लिटर दुधासाठी ८० हजार रुपये द्यावे लागत आहेत. तिकडे, कोलंबियात व्हेनेझुएलाच्या १० लाखांवर नागरिकांनी आश्रय घेतला आहे.


विरोधी नेते जुआन यांची आज फेरी
जुआन यांनी मादुरोंवर दबाव वाढवण्यासाठी मंगळवारी देशभर फेऱ्या काढण्याची घोषणा केली.

बातम्या आणखी आहेत...