Home | International | Other Country | venezuela light issue news in marathi

व्हेनेझुएलातील 18 राज्यांतील वीज गुल, 2 कोटी लोकांना फटका 

वृत्तसंस्था | Update - Mar 09, 2019, 11:38 AM IST

व्हेनेझुएलावर राजकीय संकट असतानाच देशातील 23 राज्यांपैकी 18 राज्यांत गुरूवार पासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे...

 • venezuela light issue news in marathi

  कॅराकस - व्हेनेझुएलावर राजकीय संकट असतानाच देशातील २३ राज्यांपैकी १८ राज्यांत गुरूवार पासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्याचा फटका देशातील २ कोटी लोकांवर पडला आहे. राजधानी कॅराकसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. सुमारे १० हजार लोकांना रात्र विमानतळावरच काढावी लागली. दुसऱ्या दिवशी ते बसने घरी परतले. या ब्लॅक आऊटवरून राजकारण तापले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.


  राष्ट्रपती निकालस मदुरो यांनी विरोधी नेते ज्युआन गुइडो यांच्यावर आरोप केले. अमेरिकेसोबत मिळून गुइडो देशाला काळोखात ढकलू लागले आहेत, असा आरोप त्यांनी केला. बोलिव्हर राज्यातील जलविद्युत प्रकल्प बंद पडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे प्रसार माध्यमातून सांगण्यात आले.


  संकटाला मदुरोच जबाबदार : अमेरिका
  अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिआे यांनी ट्विट करून या परिस्थितीला राष्ट्रपती मदुरोच जबाबदार असल्याचा आरोप केला. कोलंबिया, इक्वाडोर, ब्राझील हे त्यासाठी जबाबदार नाहीत. त्यांच्या सत्तेमुळे देशात वीज संकट, भूकबळी वाढले, असे ते म्हणाले.


  2016 मध्ये 60 पेक्षा जास्त दिवस अंधारात
  व्हेनेझुएलात २००७ मध्ये वीज केंद्राचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून सरकार राजकीय संकट काळात ब्लॅक आऊटचा मार्ग धरतात, असे म्हटले जाते. आतापर्यंत कोणत्याच सरकारने त्याची थेट जबाबदारी स्वीकारलेली नाही. २०१६ मध्ये सर्वाधिक ६० वेळा ब्लॅक आऊट झाले होते. तत्कालीन सरकारने मात्र दररोज केवळ ६ तासांचे भारनियमन असल्याचे सांगितले होते. वास्तविक जलविद्युत प्रकल्पात उंदरांमुळे हानी पोहोचते.

Trending