Home | International | Other Country | Venezuelan Guadalos rally against President Maduro, 2.5 lakh people participated

व्हेनेझुएलात गुआडो यांची राष्ट्रपती मदुरोंच्या विरोधात रॅली, 2.5 लाख लोक सहभागी, अमेरिकेसह 20 देशांचा पाठिंबा, रशिया-चीनचा विरोध

वृत्तसंस्था | Update - Feb 14, 2019, 10:22 AM IST

सैन्याने परदेशातून मिळणारी अन्नधान्य, औषधाची मदत रोखली

 • Venezuelan Guadalos rally against President Maduro, 2.5 lakh people participated

  वॉशिंग्टन, कॅराकस- व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये विरोधी पक्ष नेते जॉन गुआडो यांची बुधवारी जाहीर सभा झाली. त्यात सुमारे अडीच लाख लोक सहभागी झाले होते. लष्कराने मानवतेच्या पातळीवर मिळणारा निधी रोखू नये, असे आवाहन गुआडो यांनी केले आहे. राष्ट्रपती निकालेस मदुरो यांच्या आदेशानुसार लष्कराने सीमेवर नाकेबंदी केली आहे. त्यामुळे विविध देशांकडून येणारी खाद्य पदार्थ, औषधी व इतर वस्तू रोखण्यात आल्या आहेत. त्याचा मार्ग खुला करावा, अशी मागणी गुआडो यांनी केली आहे. देशातील २० लाखाहून अधिक लोकांचे अनारोग्य वाढू लागले आहे. गुआडो यांच्या नेतृत्वाला अमेरिकेसह २० देशांचा पाठिंबा आहे. चीन, तुर्की, रशियाचा विरोध आहे.

  मदुरोंनी कोणाचीही मदत घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे भारतासह इतर देशांनी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणे तत्काळ बंद केले पाहिजे. आम्हाला भारतासोबतचे संबंध, व्यापार वाढवायचा आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांनी भारताला इशारा दिला. राष्ट्रपती निकोलस मदुरो यांचे कृत्य विसरण्यासारखे नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. व्हेनेझुएला भारताला तेल निर्यात करणारा तिसरा मोठा निर्यातदार देश आहे. अलीकडेच तेलमंत्र्यांनी वस्तू विनिमयातून भारताशी कच्च्या तेलाचा मोठा व्यवहार करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर अमेरिकेने ही आक्रमक भूमिका घेतली आहे.


  रशियाची अमेरिकेला धमकी- व्हेनेझुएलात लष्करा हस्तक्षेप नको
  रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लावरोव्ह यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांच्याशी फोनवरून संभाषण केले. अमेरिकेने सैन्य पाठवू नये. ते आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरेल. सैन्य पाठवण्याचा एक पर्याय आहे, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याच महिन्यात म्हटले होते.त्यामुळे आता या क्षेत्रात तणाव वाढीची भीती आहे.

  पाच वर्षांत ३० लाख लोकांचे व्हेनेझुएला सोडून पलायन

  आर्थिक संकट :

  संयुक्त राष्ट्राच्या मते आर्थिक संकटामुळे ५ वर्षांत ३० लाख लोकांनी व्हेनेझुएला सोडून पलायन केले.

  राजकीय संकट :

  मदुरो २०१३ पासून सत्तेवर आहेत. गतवर्षी निवडणुकीतील घोटाळ्याच्या आरोपानंतर स्वत:ची अंतरिम राष्ट्रपती म्हणून घोषणा केली.

Trending