आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या लोकसंख्येत 50% महिला, त्यांना संसदेमध्ये आरक्षण मिळायला हवे- वेंकैया नायडू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी शनिवारी संसदेत महिलांसाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव मांडला. मुंबईत लोकतंत्र पुरस्कार समारंभात त्यांनी आपण देशाला ‘मदर इंडिया’ म्हणतोत ‘फादर इंडिया’ नाही असे म्हटले होते. यावरुनच देशात महिलांना किती महत्व दिले पाहीजे ते सिद्ध होते. देशात महिलांची टक्केवारी 50 टक्के आहे. महिला प्रतिनिधींसाठी काम करताना योग्य त्या सुविधा पुरवल्या पाहीजेत.


लोकसभेत महिलांसाठी 33 % आरक्षणाचा प्रस्ताव 2008 मध्ये आणला होता, पण हा मागील 10 वर्षांपासून प्रलिंबीत आहे. यावेळेस 17 व्या लोकसभेत सर्वात जास्त 78 महिला खासदार निवडणून आल्या आहेत. स्वतंत्र भारतातील हा सर्वात मोठा आकडा आहे.


ते पुढे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच स्थानिक निवडणुकाही पाच वर्षांनी व्हायला हव्यात. त्यांनी स्थानीक निवडणुकीत महिलांना 50 % दिल्यामुळे महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. अनेक राज्यात उशीराने स्थानीक निवडणुका होत असल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...