आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीच्या ज्या आलिशान व्हिलामध्ये लग्न करताहेत 'बाजीराव-मस्तानी', तेथे एका दिवसाचे भाडे आहे 25 लाख रुपये, पाहा 10 Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवाळीनंतर 7 दिवसांनी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह 14-15 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. या दांपत्याचे लग्न इटलीच्या लेक कोमोमधील आलिशान व्हिला डेल बालबियानेलोमध्ये होईल. इंद्रधनुष्य आणि बीचचे सुंदर दृश्य असलेला विला आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. हे हॉटेल अनेक इंटरनॅशनल ताऱ्यांसाठी वेडिंग डेस्टिनेशन राहिलेले आहे. येथील किराया 8.5 लाख रुपयांपासून 25 लाख रुपये प्रतिदिवसापर्यंत आहे. कपल 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहे आणि 1 डिसेंबर रोजी भारतात रिसेप्शन होणार असल्याचे वृत्त आहे. मँचेस्टर युनायटेडचे फुटबॉलर क्रिस स्मेलिंग आणि त्यांची पत्नी सॅम कूकचे लग्नही येथेच झाले होते. या व्हिलामध्ये 80 पाहुण्यांसाठी जागा आहे. दीपिका आणि रणवीरचे लग्नासाठी फिल्ममेकर आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साली, शाहरुख खान, अर्जुन कपूर, रोहित शेट्टी आणि करण जोहर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 

 

स्वर्गापेक्षा कमी नाही लेक कोमो...
- इटलीवासीय याला 'लागो दी कोमो' म्हणतात. परंतु जगभरात ही जागा लेक ऑफ कोमो नावाने प्रसिद्ध आहे. हे आल्प्स पर्वताच्या तळाशी वसलेले आहे. ही जागा इटलीच्या मिलान शहरापासून तासाभराच्या अंतरावर आहे. 


- ही सरोवराच्या काठी वसलेली छोटीशी वस्ती आहे. येथे हिरवेगार बगिचे, लक्झरी विलाज आणि सुंदर व्हिलेज आहे. येथे येणारे निसर्गसौंदर्य पाहून मंत्रमुग्ध होऊन जातात. जगातील मोठमोठे सिलेब्रिटी या जागेला पसंती देतात. यात अनुष्का शर्मा, मडोना, हॉलीवूड स्टार जॉर्ज क्लूनी आणि वर्जिन ग्रुपचे मालक रिचर्ड ब्रैनसन यांचा समावेश आहे.


- स्वत: दीपिका आणि रणवीरला हे स्थळ खूप आवडते. जॉर्ज क्लूनी आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांनी तर येथे आलिशान घर बांधलेले आहेत. ब्रिटनच्या प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केल येथे सुट्या घालवणे पसंत करतात. येथे अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि खेळाडूंचे लग्न झालेले आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या आलिशान स्थळाचे आणखी Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...