शुक्राचे राशी परिवर्तन / शुक्राचे राशी परिवर्तन / 10 मे रोजी शुक्राने मीनमधून मेष राशीत केला प्रवेश; मिथुन आणि सिंह राशीसाठी ठरणार लाभदायक

कोणत्या राशीसाठी शुभ असेल शुक्र आणि कोणत्या राशीला बाळगावी लागेल सावधगिरी
 

दिव्य मराठी वेब टीम

May 11,2019 05:32:00 PM IST

जीवन मंत्र डेस्क - 10 मे शुक्रवारी रात्री 8.10 वाजेच्या सुमारास शुक्र ग्रहाने मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला आहे. शुक्रच्या मेष राशीमध्ये येण्याने गरमीत वाढ होणार आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार मेष राशीतील शुक्रामुळे सर्व 12 राशींवर याचा थेट प्रभाव पडणार आहे. काही राशींसाठी हा ग्रह शुभ ठरेल तर काही लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या शुक्र ग्रहाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशीवर काय परिणाम होणार


शुक्रचे राशीफळ

मेष
सध्या याच राशीमध्ये शुक्राने प्रवेश केला आहे. यामुळे काम वाढेल पण प्रसन्नता देखील मिळे. वैभव वाढण्यात मदत होईल. अति कामामुळे मानसिक तणाव वाढेल. पैशाची कमी येणार नाही.


वृषभ
बारावा शुक्र असल्यामुळे दिखाव्याच्या गोष्टींवर खर्च होईल. अनावश्यक कार्य करावे लागेल. कमी लाभ असून अडचणी राहतील.


मिथुन
तुमच्या एकादश शुक्र असेल. यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. वैभव आणि संपन्नता मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी काम सोपे होईल. कायदेशीर घटनांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत.


कर्क
या राशीसाठी शुक्र दहाव्या स्थानावर असेल. यामुळे नशीबाची साथ मिळेल आणि कामाचा व्याप वाढेल. नवीन मित्र मिळण्याची शक्यता. प्रेमप्रकरणात यश मिळेल.


सिंह
या राशीसाठी शुक्र नवव्या स्थानी असल्यामुळे कामाचा व्याप राहिल. परिस्थिती सुधारेल. नवीन संपर्क जोडल्या जातील. उत्पन्नामध्ये वाढ होईल. मित्रांची साथ लाभेल. नवीन काम करण्याची संधी मिळेल.


कन्या
या राशीत शुक्र आठवा राहील. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. काळजी घेण्याचा काळ. वेळेवर उधारी चुकविण्याची गरज, अन्यथा अडचणीत वाढ होऊ शकते.


तुळ

शुक्रा सातवा असल्यामुळे अविवाहिक लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहजरित्या धन प्राप्ती होईल. नवीन मित्र बनवताल. कामे वेळेत मार्गी लागतील.


वृश्चिक
या राशीत सहावा शुक्र राहणार आहे. शारिरीकरित्या अस्वस्थ वाटेल. शुक्र गुप्तपण प्रहार करू शकतो. अज्ञात भय राहिल. खर्च वाढेल.


धनु
धनुसाठी पाचवा शुक्र आहे. नोकरीत लाभ मिळेल. मुलांकडून सुख प्राप्ती होईल. उत्पन्नात वाढ कायम राहिल. कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण असणार आहे.


मकर
चौथा शुक्र असल्यामुळे शिल्लक काम करावे लागेल. अनियंत्रित खर्च होण्याची शक्यता आहे. तणाव आणि अडचणींचा सामना करावा लागेल. कायदेशीर कामे मार्गी लागतील.


कुंभ
राशीत तिसरा शुक्र असल्यामुळे बहीण-भावाकडून सुख मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. उत्पन्न चांगले राहून वाद मिटतील.


मीन
दुसरा शुक्र तुम्हाला धन लाभ देणारा आहे. कामाचा विस्तार होऊन उत्पन्नात चांगले राहिल. मित्राकडून अपेक्षा पूर्ण होतील. इतरांना मदत करणे आवश्यक आहे.

X
COMMENT