Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Verul-Ajanta tickets rate doubled, but lack of facilities; Complain of foreign tourists

वेरूळ-अजिंठ्याच्या तिकिटांत दुप्पट वाढ, तुलनेत सुविधांचा मात्र अभाव; विदेशी पर्यटकांची तक्रार

विशेष प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 09:36 AM IST

देशातील उत्कृष्ट पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या अजिंठा आणि वेरूळच्या लेणींचे संवर्धन चांगल्या पद्धतीने होत असले तरी भारतीय

 • Verul-Ajanta tickets rate doubled, but lack of facilities; Complain of foreign tourists

  औरंगाबाद- देशातील उत्कृष्ट पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या अजिंठा आणि वेरूळच्या लेणींचे संवर्धन चांगल्या पद्धतीने होत असले तरी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ( एएसआय) येथील प्रवेश तिकिटात दुपटीहून अधिक वाढ केली असताना त्या तुलनेत सुविधांचा मात्र अभाव असल्याची तक्रार विदेशी पर्यटक करत आहेत. या ठिकाणी चांगले स्वच्छतागृह, आरामकक्ष, माहिती फलक, ऑडिओ गाइड, अपंगासाठी सेवा आणि विक्रेत्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळावी, अशी परदेशी पर्यटकांची अपेक्षा आहे.


  भारतातील प्राचीन स्मारकांची जबाबदारी एएसआयकडे आहे. या स्थळांचे संवर्धन, सुशोभीकरण, पर्यटकांना सुविधा पुरवण्याचे कामही एएसआयच्या अखत्यारीत येते. यासाठी एएसआय पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारते. सुमारे ५ वर्षांपूर्वी एएसआयच्या अखत्यारीतील जागतिक वारसा स्थळांसाठी १० रुपये तर अन्य स्थळांसाठी ५ रुपये तिकीट होते. त्यावेळी चकचकीत कागदावर बरीचशी माहिती असणारे तिकीट दिले जायचे. नंतर मात्र तिकिटाचे दर सातत्याने वाढत गेले. दोन महिन्यांपूर्वी यात मोठी वाढ करण्यात आली. मात्र, त्या तुलनेत सुविधांचा

  अभाव असल्याची प्रतिक्रिया स्पेनच्या पर्यटक अँटोनियो गोमेझ आणि मायरियम यांनी केली आहे. ते नुकतेच वेरूळ आणि अजिंठा लेणी बघण्यासाठी आले होते.


  पैसे घ्या पण सोयी द्या
  तिकिटाचे दर वाढल्यामुळे परदेशी पर्यटकांचे बजेट कोलमडले आहे. त्यांना याची तक्रार नाही. मात्र, त्या तुलनेत सुविधा देण्याची त्यांची अपेक्षा असते. अॅविग्नान येथील पोपच्या महालाला बघण्यासाठी पर्यटक १० युरो तिकीट खर्च करतात. यासोबत त्यांना आयपॉड मिळतो. या आयपॉडमधून महालाचा पुरातन लूक बघता येतो. आपल्याकडेही अशा सुविधा असाव्यात अशी पर्यटकांची तक्रार असते.
  - आकाश डुमने, चिनी भाषांतरकार, पर्यटक


  या हव्यात सुविधा
  अँटोनियो गोमेझ आणि मायरियम हे पर्यटन प्रेमी जगभरात प्रवास करत असतात. त्यांनी अजिंठा-वेरूळचे पर्यटन सुखकर होण्यासाठी पुढील उपाय सुचवले आहेत :
  - ठिकठिकाणी माहिती देणारे फलक असावेत. आपण नेमके काय बघतोय हे त्यांना समजावे
  - ऑडिओ गाइडची सोय
  - लेणी बघताना ज्येष्ठ नागरिक, महिलांना विश्रांतीसाठी लेणी परिसरातच विश्रांतीची सोय
  - वस्तू विकण्यासाठी मागे लागणाऱ्या विक्रेत्यांपासून सुटका लेणीच्या आतच नव्हे तर बाहेरचीही स्वच्छता
  - अपंगासाठी खास सोय
  - दोन्ही स्थळांचे माहिती देणारे पत्रके, पुस्तके चांगले, स्वच्छ जेवण आवश्यक

Trending