आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Very Good Dog Fetches Owner An Energy Drink From The Fridge When Her Blood Sugar Drops

एकटेपणा दूर करण्यासाठी आजारी मुलीने आणला डॉगी, एका निर्णयाने बदलले संपुर्ण आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टम्पा. अमेरिकेच्या फ्लोरिडा स्टेटमध्ये राहणारी एक मुलगी खुप कमी वयात अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करत आहे. या आजारांपासून दूर करण्यात तिला तिचा डॉगी जास्त मदत करतो. त्या मुलीला कोणत्याही प्रकारच्या वेदना होण्यापुर्वी डॉगीला कळते आणि तो तिला अलर्ट करतो. एकदा या मुलीची तब्येत खुप बिघडली तेव्हा या पाळव कुत्र्याने मुलीचे प्राण वाचवले. 

 

बॉडीमध्ये होतात भयानक वेदना 
- ही स्टोरी अमेरिकेच्या टम्पा शहरात राहणा-या 25 वर्षीय मेल लुकास आणि तिच्या पाळीव डॉगीची आहे. लुकास कमी वयातच अनेक आजारांचा सामना करत आहे. मुलीला एहलर डॅनलोस सिंड्रोमसोबतच PTSD (पोस्ट ट्रामेटिक स्ट्रेस डिसऑर्ड) आणि हायपोग्लाईसेमिया(लो ब्लड शुगर)चा आजार आहे. 
- 'एहलर डॅनलोस' एक अतिसंवेदनशील आजार असतो, यामध्ये गुडघे, बोटं आणि कोपरामध्ये वेदना होतात. एवढ्या सर्व समस्या असतानाचही ती मुलगी खुप चांगल्या प्रकारे आपले आयुष्य मॅनेज करत आहे.
- लुकासला जे आजार होते, ते तिच्या आंतरिक अंग म्हणजेच लिव्हर, फुफ्फूस आणि हार्टला प्रभावित करत होते. ज्यामुळे तिचे ब्लड शुगरही कमी राहत होते. हृदयाची गती वाढत होती. 
- या वर्षी एप्रिलमध्ये तिने आपला एकटेपणा दूर करण्यासाठी एक गोल्डन रिट्रीवर ब्रीडचा डॉगी खरेदी केला. त्याचे नाव गॉड्रिक ठेवले. तो लवकरच तिचा बेस्ट फ्रेंड बनला आणि तिच्या रोजच्या आयुष्यात तिच्या आजारामुळे येणा-या अडचणींमध्ये तिची मदत करु लागला. 


लुकासची मदत करणे शिकला डॉगी 
- गॉड्रिक हा काम करण्यात पहिले ट्रेन नव्हता. परंतू लुकाससोबत राहत असताना तो लवकरच तिच्या लहान-मोठ्या वस्तू आणणे शिकला. 
- मुलीने सांगितले की, 'माझे ब्लड शुगर आठवड्यातून तीन पेक्षा जास्त वेळा कमी होते, यामुळे मला एका एनर्जी ड्रिंकची गरज असते.' मेलने सांगितले, गॉड्रिक आता ब्लड शुगर ड्रॉपचे लक्षण समजण्याविषयी शिकत आहे. नुकतेच तीन वेळा माझी ब्लड शुगर कमी झाली, तेव्हा त्याने मला दोन वेळा नोटिसही केले होते. 
- लुकासने सांगितले, 'एकदा मी कार ड्राइव्ह करत होते, तेव्हा मला गॉड्रिकने नोटिस केले. तेव्हा मी कार गॅस स्टेशनवर थांबवली आणि उतरुन तात्काळ काही स्नॅक्स खाल्ले.'
- मुलीने सांगितले की, 'एकदा माझे ब्लड शुगर अचानक कमी झाले होते, मी उठूही शकत नव्हते. तेव्हा गॉड्रिकने माझी मदत केली. तो फ्रीजमधून माझ्यासाठी एनर्जी ड्रिंक घेऊन आला होता.'

 

वेदनेपुर्वीच करतो अलर्ट 
- हा डॉगी काही दिवसातच फ्रिज उघडणे, त्यामधून आवश्यक एनर्जी ड्रिंक बाहेर काढणे शिकला. तसेच तो मुलीला होणारी डोकेदुखी योग्य वेळी ओळखतो. 
- श्वानांमध्ये मेंदूमध्ये असणा-या नाजुक रासायनिक परिवर्तनांची जाणिव होण्याची क्षमता असते. यामुळे लुकासला वेदना होण्याच्या अर्धातास अगोदर कळते आणि तिला अलर्ट करणे सुरु करतो.
- लुकासला अलर्ट करण्यासाठी गॉड्रिक तिला थापडतो किंवा तिचे हात चाटतो. मुलगी म्हणते की, 'माझ्यासाठी तो संपुर्ण जग आहे. माझे त्याच्याशिवाय काय होईल, हे मला माहित नाही. आम्ही प्रत्येक काम सोबत करतो. तो सध्या फक्त सात महिन्यांचा आहे, थोडा मोठा झाल्यावर तो लुकासच्या सोबत येण्याजाण्यास तयार होईल.'

 

 

बातम्या आणखी आहेत...