आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोडाफोडीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीला बसणार मोठा धक्का, 17 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात...?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकारणात अनेक राजकिय भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. अनेक पक्षातील आमदार, खासदार, नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आणि सध्याही होत आहेत. यातच आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे एकूण 17 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली आहे. यामुळे राजीकय वर्तुळात मोठी खळबळं माजली आहे.


बाहेरून आलेल्या आमदार खासदारांना पक्षात आल्यावर उमेदवारी दिली, तर पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. यामुळे कार्यकर्त्यांच्या असंतोषाचाही सामना करावा लागेल, असे भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना वाटत असल्याने थोडा वेळ थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


नुकतेच काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. तर राष्ट्रवादीचे कोल्हापुरचे उमेदवार धंनजय महाडिक यांचा दारुण पराभव झाल्यानंतर तेही आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते विखे पाटील, चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य तसेच अनेक नेते भाजपच्या वाटेवर असून 1 जूनला भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.